राजस्थानमध्ये चमत्कार घडणार ? सचिन पायलट यांच्या संपर्कात काँग्रेसचे 30 आमदार तर काही अपक्षांचीही साथ

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानमधील गहलोत सरकारमध्ये राजकीय संकटाचा काळ सुरू आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे 30 आणि काही अपक्ष आमदार सचिन पायलटच्या संपर्कात आले आहेत. या आमदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये पाठिंबा देण्याची शपथ घेतली आहे.

सीएम गहलोटच्या सभेपासून दूर राहतील सचिन पायलट
या सर्वां दरम्यान उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या लोकेशनविषयी अनेक अंदाज बांधले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन पायलट रविवारी सकाळी त्यांच्या कौटुंबिक मित्राच्या दिल्ली येथे निवासस्थानी होते. या व्यतिरिक्त सचिन यांनी आपल्या समर्थकांना पुढच्या रणनीतीबाबतही संदेश दिला आहे. त्यांनी सर्वांना एकजूट राहण्याचा संदेश दिला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यातील ताजी राजकीय परिस्थिती लक्षात घेता रविवारी रात्री आठ वाजता कॉंग्रेस विधिमंडळ पक्ष आणि मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. या बैठकीत ताज्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा होणार असून एकजुटीचा संदेश देण्यात येणार होता, मात्र आता सोमवारी सकाळी साडेदहा वाजता ही बैठक होणार आहे. यात कॉंग्रेसमध्ये आलेल्या बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) आमदारांनाही बोलविण्यात आले आहे.

पायलट आणि त्यांच्या समर्थकांचे सीएम गहलोतशी संबंध चांगले नाहीत
माहितीनुसार राजस्थान कॉंग्रेस संकट आणि गटबाजीच्या भोवऱ्यात आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार यांचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी चांगले संबंध नाहीत. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेल्या मतभेदांचे कारण म्हणजे पोलिसांनी आमदारांच्या ‘घोडे-व्यापार’ प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देऊन सचिन पायलट यांना नोटीस पाठविणे, यावर उपमुख्यमंत्री संतप्त आहेत.

दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आरोप केला आहे की, भाजप त्यांच्या (कॉंग्रेस) आमदारांना 15-15 कोटी रुपये देऊन सरकार पाडण्याचे षडयंत्र रचत आहे. मात्र, त्यांनी दावा केला की, त्यांचे सरकार स्थिर आहे आणि पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like