‘गुलाबी’ शहर जयपूरचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश, PM मोदींच्या ‘ट्विटर’वरून शुभेच्छा

जयपूर : वृत्तसंस्था – युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात अजून एका स्थळाचा समावेश झाला आहे. राजस्थानची राजधानी जयपूर शहराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. जयपूरला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. ही घोषणा युनेस्कोने आज शनिवारी केली आहे. भारतामध्ये सध्या ३७ जागतिक वारसा स्थळे आहेत. जयपूरला वारसा स्थळाचे स्थान देण्यात आल्यामुळे भारतातील जागतिक वारसा स्थळाची संख्या ३८ वर पोहचली आहे. राजस्थानातील चित्तोडगडचा किल्ला, कुंभलगढ, जैसलमेर, रणथंबोर, आणि गागरोन किल्ल्याचा यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे.

मोदींनी दिल्या शुभेच्छा
ही घोषणा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या बाकु येथे सुरु असलेल्या ४३ व्या बैठकीत करण्यात आले आहे. ही घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, जयपूरचा संबंध संस्कृती आणि शौर्याशी आहे. उत्साहात भरलेला जयपूरचा पाहुणचार लोकांना आकर्षित करतो. मला आनंद आहे की जयपूर शहराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात स्थान दिले.

गेल्या वर्षी पाठवला होता प्रस्ताव
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पिंक सिटीला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करावे असा प्रस्ताव सरकारकडून पाठवण्यात आला होता. २०१७ च्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक वर्षाला एका राज्यातून एकच प्रस्ताव जागतिक वारसा स्थळासाठी पाठवला जाऊ शकतो. हा दर्जा मिळाल्यामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळते. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो व अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होते.

सिनेजगत बातम्या

अभिनेत्री ईशा गुप्ताचा ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकावर गैरवर्तानाचा आरोप

हनीमूनवर ‘इंटिमेट’ झाले न्यू मॅरीड कपल ‘चारु आणि राजीव’, रोमॅटिंक अंदाजात केले ‘लिप लॉक’

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !