CISF कमांडोनं केलं महिला IAS अधिकार्‍यावर एकतर्फी प्रेम, पतीला फसविण्याच्या नादात झाली जेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत असलेल्या एका सीआयएसएफ कमांडोला एकतर्फी प्रेमातून तुरुंगाची हवा खावी लागली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून महिलेच्या पतीला एका ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याला यामध्ये यश आले नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या कमांडोला आणि त्याच्या मित्राला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.

कमांडेट रंजन प्रताप परराष्ट्र मंत्रालयात आहे कार्यरत –

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रंजन प्रताप सिंह हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी असून सध्या तो परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत आहे. 42 वर्षीय रंजन प्रताप सिंह आणि सूचना आणि प्रसारण मंत्रालयामध्ये कार्यरत असलेला त्याचा मित्र अमित सावंत दोघेही या महिलेच्या पतीला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत होते. ट्रेनिंगवेळी राजस्थान मध्ये कार्यरत असलेल्या एका महिला IAS बरोबर रंजन प्रतापची ओळख झाली होती. त्यानंतर तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला होता. मात्र त्या महिलेला याची काहीही माहिती नव्हती. त्यामुळे आरोपी त्या महिलेच्या पतीचा बदला घेण्यासाठी त्याला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत होते.

असा केला प्रयत्न –

पोलिसांना या प्रकरणी माहिती मिळाली कि, एका ठिकाणी एका संदिग्ध कारमध्ये काही प्रकार घडत आहे. त्यावेळी पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता यामध्ये पोलिसांना 500 ग्राम चरसची काही पाकिटे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांना एका व्यक्तीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या गाडीतील इसमाकडे चौकशी केली असता त्याने दोन व्यक्ती आपल्याकडे आल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये विदेश मंत्रालयाचे स्टिकर असलेली एक गाडी आढळून आली.

मित्र देखील अटकेत –

तपास करत दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी कमांडेंट रंजन प्रताप सिंह याला अटक केली. त्यावेळी त्याला या प्रकरणात त्याचा मित्र नीरज चौहान मदत करत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला देखील अटक करत न्यायालयात हजार केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर पुढील तपास सुरु असून यामध्ये अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Visit : Policenama.com