’24 कॅरेट’ सोन्याचं तयार केलं ‘उपरणं’, किंमत ऐकाल तर बसेल धक्का

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – राजस्थानी पोशाखात उपरण्यावरील काठाला असलेले महत्व अपरंपार आहे. परंतू एका अशाच उपरण्यावर 24 कॅरेट गोल्डचा काठ विणण्यात आला आहे. या उपरण्याचे वजन जवळपास 580 ग्रॅम आहे तर लांबी 9 मीटर आहे. याची निर्मिती जयपूरचे डिझायनर भूपेंद्र सिंह शेखावत यांनी केली. ते म्हणाले की या उपरण्याची निर्मिती अनेक दिवासांपासून सुरु होती. याच्या निर्मितीसाठी 48 लोक काम करत होते. याची किंमत हजार एक रुपये नाही तर जवळपास 22 लाख रुपये आहे.

80 वर्षापूर्व राजपूत वापरत होते हे वस्त्र –
भूपेंद्र यांनी सांगितले की हा पारंपारिक पोशाख आहे. जवळपास 70 ते 80 वर्षांपूर्वी राजपूत सोन्याचे बनवण्यात आलेले उपरणे परिधान करत होते. परंतू ही परंपरा लोप पावत गेली. ते म्हणाले की ते अनेक दिवसांपासून विचार करत होतो शेवटी आम्ही याची निर्मिती केली. भूपेंद्र म्हणाले की हे तयार करणे सोपे काम नव्हते, तयार करताना आम्हाला अनेक समस्या आल्या.

पहिल्यांदा तांबे आणि चांदीचे तयार केले उपरणं –
भूपेंद्र यांनी सांगितले की उपरण बनवण्याआधी आम्ही तांब्याच्या तारांचे उपरण तयार केले. यात यश आल्यावर आम्ही ते चांदीत तयार केले आणि ते लोकांच्या पसंतीला उतरले. त्यानंतर त्यांना सोन्यात उपरण्याची निर्मिती केली. ते म्हणाले की हे उपरणे तयार केल्यावर मला अनेकांचे फोन आले, अनेकांना हे उपरणे खरेदी करायचे आहे.

Visit : Policenama.com