जयपुर : वाढणारे कोरोना रूग्ण पाहून पोलिस महासंचालकांनी दिला आदेश, म्हणाले – ‘मुख्यालयातील 50 स्टाफ करेल वर्क फ्रॉम होम’

जयपुर : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राजस्थानचे डीजीपी भूपेंद्र सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, पोलिस मुख्यालयात काम करणारे निम्मे कर्मचारी पुढील दोन आठवड्यांसाठी घरून काम करतील. शुक्रवारी अतिरिक्त संचालकांसह 20 पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारनंतर पोलिस मुख्यालय बंद करून शनिवारी व रविवारी पोलीस मुख्यालयाची स्वच्छता करण्यात आली. सोमवारी सुमारे 100 पोलिसांना नमुना चाचणीसाठी घेण्यात आले. डीजीपी म्हणाले की, त्यांनी पोलिस मुख्यालयातील सर्व पोलिस शाखांच्या प्रमुखांना सांगितले कि पोलीस स्थानकातील अर्ध्या पोलिसांना रोटेशन तत्त्वावर बोलवावे.

डीजीपी म्हणाले – पोलिस मुख्यालयातील सर्व विभागातील ५० टक्के कर्मचार्‍यांवर रोटेशन पॉलिसी दोन आठवड्यांसाठी लागू केली जावी आणि त्याचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. डीजीपीने सर्व अधिकाऱ्यांना तश्या सूचनाही दिल्या आहेत.पुढे त्यांनी सांगितले कि फक्त तक्रारदाराच पोलिस अधिका भेटू शकतील. बरेचदा तक्रारदारासह अनेक लोकं पोलिस मुख्यालयात जाताना पाहिले जाते.भूपेंद्र सिंह आपल्या आदेशात म्हणाले- “जोपर्यंत तक्रारदार आणि त्यांच्या सोबतच्या लोकांचा संबंध आहे तोपर्यंत पोलिस मुख्यालयाने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच लोकांना येण्याची परवानगी मिळण्याची खबरदारी घ्यावी.” आवश्यकगरज भासल्यास तक्रारदारासह दुसर्‍या व्यक्तीला बोलवावे लागेल याची अधिकाऱ्यांनी खात्री करुन घ्यावी. रिसेप्शनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केवळ तक्रारदारालाच भेटण्याची परवानगी दिली पाहिजे हे सुनिश्चित केले पाहिजे. ”