‘IOCL’ मॅनेजरच्या ‘पत्नी’ची हत्या, 21 महिन्याच्या ‘मुलाचे’ अपहरण करुन 30 लाखाच्या ‘खंडणी’ची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. मंगळवारी जगतपुरामध्ये संध्याकाळच्या वेळेत काही नराधमांनी एका महिलेची घरात घुसून हत्या केली. गुन्हेगारांनी जाता जाता महिलेच्या 21 महिन्याच्या मुलाचे शुभमचे अपहरण केले. एवढेच नाही तर अपहरणानंतर महिलेच्या मोबाईल फोनवरुन तिच्या पतीला म्हणजेच रोहित तिवारीला मेसेज पाठवून 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. ही धक्कादायक घटना यूनिक टॉवर आय ब्लॉकमध्ये घडली.

या इमारतीत राहणार रोहित तिवारी (IOCL मध्ये मॅनेजर) आपली पत्नी श्वेता तिवारी आणि 21 महिन्यांच्या मुलगा शुभम बरोबर राहतात. शक्यता वर्तवली जात आहे की श्वेता यांची हत्या मुलाला वाचवण्याचा संघर्षातून झाली असावी. जयपूर पोलिसांनी हत्या आणि अपहरणमध्ये परिचित व्यक्तीचा हात असल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींचा शोध सुरु करण्यात आला आहे.

एअरपोर्टवर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे रोहित –
पोलिसांच्या मते रोहित तिवारी दिल्लीचे रहिवासी आहेत आणि ते इंडिय ऑयलमध्ये मॅनेजर पदावर काम करतात. ते जवळपास दिड वर्षापूर्वी जयपूरला आले होते. आणि भाड्यांच्या घरात राहत कुटूंबासोबत राहत होते. सध्या रोहित यांची जयपूरच्या एअरपोर्टवर पोस्टिंगवर आहेत. असे सांगण्यात येत आहे की यावेळी ते कामावर होते. त्यांनी सांगितले जी घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पत्नी श्र्वेताबरोहर त्यांचे सकाळी 10.30 च्या सुमारास फोनवर बोलणे झाले होते.

पोलीसांच्या मते संध्याकाळी चार वाजता नोकर म्हणून काम करणारी महिला प्लॅटवर पोहचली तर दरवाजा उघडा होता. महिलेने आत जाऊन पाहिले तर श्र्वेता यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हे पाहून कामवाली माहिला घाबरुन ओरडली. त्यामुळे शेजारचे लोक जमा झाले आणि घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. शेजारच्यांनी सांगितले की, श्र्वेताला बालकनीमध्ये कपडे वाळत घालताना पाहिले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/