जयपूरमध्ये ज्या 10 मजली हॉस्पीटलमध्ये संशयिताला केलं होतं दाखल, तेथील सर्व रूग्ण 24 तासाच्या आत रूग्णालय गेले सोडून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इटलीचे पर्यटक एंड्री कार्ली आणि त्यांच्या पत्नीला तपासणी वेळी कोरोनाव्हायरस सकारात्मक झाल्याने एमएमएस रुग्णालयाच्या आईसोलेशन वॉर्डमध्ये भर्ती झालेल्या ९  संशयितांना मंगळवारी रात्री प्रताप नगर येथील राजस्थान विद्यापीठ अँड हेल्थ सायन्स (आरयूएचएस) रुग्णालयात  हलविण्यात आले. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक २८६ मध्ये संशयितांना शिफ्ट केल्याची माहिती मिळताच १० माजली असणाऱ्या या  रुग्णालयातून सर्व रुग्ण सुट्टी घेऊन निघून गेले. आयसीयूसह पुरुष आणि महिलांच्या सामान्य वॉर्डमधूनही रुग्णांनी सुट्टी घेतली आहे.

नर्स आणि वॉर्ड बॉय देखील संक्रमितांच्या खोलीपासून दूर :
संशयित रुग्णांना रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील वॉर्ड क्रमांक २८६ मध्ये ठेवण्यात आले आहे. त्याची देखभाल करण्यासाठी दोन नर्सिंग कर्मचारी आणि एक वॉर्ड बॉय ठेवण्यात आले आहेत. तेही वॉर्डपासून बरेच दूर बसले आहेत. त्यातील एकाकडे व्हायरस प्रतिबंधक किट देखील असून त्यांना दिलेले मास्क उत्तम क्वालीटीचे आहेत. कर्मचार्‍यांनी सांगितले की,  कुटुंबातील लोक संसर्गाच्या संभाव्यतेबद्दल काळजीत असून त्यांना परत येण्यासाठी सतत दबाव आणत असतात. मेल वॉर्डचे नर्सिंग स्टाफ केशव धाकड यांनी सांगितले की, ११ रूग्ण वॉर्डमध्ये असून सर्व निघून गेले आहेत. सामान्य वॉर्डात ६ रुग्ण होते, येथेही सर्व बेड रिकामे झाले आहेत.  रुग्णालय परिसरातील हॉस्टेलमधून देखील सर्व विद्यार्थी बाहेर गेले आहेत.
आरयूएचएस येथे दररोज सुमारे ४०० ते ५०० रुग्णांना आउटडोअर पेशंट युनिटमध्ये (ओपीडी) दाखल केले जाते. मंगळवारीही सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हीच परिस्थिती होती. दरम्यान, बुधवारी माध्यमांत आलेल्या माहितीनुसार कोरोना संशयितांना उशिरा आरयूएचएस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांनतर रुग्णालयात शांतता पसरली. आउटडोअर मध्ये आलेल्या रूग्णांची संख्या ५० ते ८० दरम्यान झाली.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कैलाशचंद बैरवा आपल्या नातेवाईक महिलेचा रिपोर्ट दाखविण्यासाठी डॉक्टरकडे आले होते. परंतु रिपोर्ट घेऊन ते जेव्हा  आरयूएचएस रुग्णालयात पोहोचले तेव्हा स्टाफने सांगितले की, आपण आता आत जाऊ शकत नाही. एसएमएस कडून रुग्ण आला आहे.  त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर तुम्ही नंतर या. पीडित रूग्ण आणि नातेवाईकांनी खूप विनवणी केली. पण निराश होऊन त्यांना परत जावे लागले.