उड्डाणापूर्वी विमानातून निघू लागला ‘धूर’, जयपूर-पुणे फ्लाइटला एक तास विलंब

जयपूर : जयपूर-पुणे फ्लाइटमूधन उड्डाणापूर्वी धूर निघू लागल्याने तातडीने विमानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर विमानात कोणताही बिघाड नसल्याचे आढळल्यावर विमानाला पुन्हा पुण्यासाठी रवाना करण्यात आले.

जयपूर एयरपोर्टवर शुक्रवारी सांयकाळी एयर आशियाचे फ्लाइट आय5-142 मधून धूर निघू लागल्याने एकच गोंधळ उडाला. सायंकाळी सुमारे 5:20 वाजता फ्लाइट जयपूरपूर पुण्यासाठी रवाना होत होते. तेव्हा अचानक पायलटला विमानाच्या मागच्या भागातून धूर निघताना दिसला.

पायलटने ही माहिती ताबडतोब एयर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर (एटीसी) आणि एयरलाइन्स टेक्निकल स्टाफला दिली. ज्यानंतर एटीसीने विमान ताबडतोब अ‍ॅप्रिनमध्ये आणण्याचे निर्देश दिले. विमान अ‍ॅप्रिनवर आणल्यानंतर विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. एक तासाच्या तपासणीनंतर विमानात कोणताही बिघाड नसल्याचे आढळल्यानंतर विमान पुन्हा पुणेसाठी रवाना करण्यात आले.