RJ : अपघातात एकाच कुटुंबातील 8 लोकांचा मृत्यू

जयपुर : वृत्तसंस्था – राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. चार लोक जखमी झाले आहेत. माहितीनुसार रात्री उशीरा भरधाव जाणारा ट्रक आणि जीपमध्ये भीषण धडक झाली, यामध्ये एकाच कुटुंबातील आठ लोकांचा मृत्यू झाला. सर्वजण मध्यप्रदेशात राहणारे होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दुर्घटनेनंतर दु:ख व्यक्त केले आहे. हे प्रवाशी खाटूश्याम जी येथे दर्शन घेऊन परतत होते.

गहलोत यांनी दुर्घटनेत जखमी झालेल्या भाविक लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली आहे. मृतांमध्ये चार पुरूष, दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. ही दुर्घटना नॅशनल हायवे क्रमांक 52 वर पक्का बांध परिसरात झाली. ट्रेलरला धडक दिल्यानंतर जीप एका भिंतीवर आपटली. जीपमधील लोक आत अडकून पडले होते.

माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी जीपमधील सर्व लोकांना बाहेर काढले. सर्व मृतदेह टोंकच्या सरकारी हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आले, तर जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये दोन चुलत भाऊ 25 दिवस पायी चालून खाटूश्याम जी मंदिरात गेले होते. त्यांचे कुटुंब त्यांना घेऊन परतत होते. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ श्याम सोनी आणि रामबाबू सोनी यांचाही समावेश आहे. रामबाबू यांचा मुलगा नयन आणि श्याम सोनी यांचा मुलगा ललित यांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला.

इतर मृतांमध्ये ममता, बबली, अक्षत आणि अक्षिता यांचा समावेश आहे. दुर्घटनेत सरिता जखमी झाली आहे, जिच्यावर उपचार सुरू आहे. सरिताची तीन वर्षांची मुलगी नन्नू सुरक्षित आहे. पोलीस अधीक्षक ओमप्रकाश यांच्यानुसार सर्व मृत मध्यप्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील जीरापुर गावातील होते. हे सर्व बोलेरो जीपने प्रवास करत होते. हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर काही लोकांचा मृत्यू झाला. डीजीपी टोंक यांचे म्हणणे आहे की, जखमींना जयपुरला रेफर करण्यात आले. दोन्ही वाहनांचे ड्रायव्हर फरार आहेत.