माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेत राजस्थानमधून काँग्रेसकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची वर्णी लावून चर्चेला पूर्णविराम लावला आहे. राज्यसभेत मनमोहन सिंह यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संख्या बळाच्या कमतरतेमुळे भाजपने येथे आपला उमेदवार दिलाच नाही. सोमवारी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्यावतीने राज्य सरकारचे मुख्य सचेतक डॉ. महेश जोशी यांनी प्रमाणपत्र स्वीकारले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिल्या शुभेच्छा
राजस्थानातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांना अनेक काँग्रेस नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मनमोहन सिंह यांची निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देत ट्विट केले की संपूर्ण राजस्थानला याचा गर्व आहे. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा संपूर्ण राजस्थानला मिळेल.

आता पर्यंत राजस्थानमधून काँग्रेसचा एकही खासदार संसदेच्या दोन्ही सभागृहात नव्हता. परंतू आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची नियुक्ती काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राजस्थानच्या मदनलाल सैनी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती.

माजी पंतप्रधान पहिल्यांदाच करणार राज्यसभेत प्रतिनिधत्व
बऱ्याच दिवसापासून मनमोहन सिंह यांची काँग्रेसकडून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येईल अशी चर्चा सुरु होती. यासाठी काँग्रेस समर्थनाची तयारी करत होती. काँग्रेसकडे ११९ आमदारांचे समर्थन आहे त्यात १०० आमदार काँग्रेसचे आहेत. तर १ आरएलडीचा, १२ इतर आणि ६ बसपाचे. पहिल्यांदाच असे होणार आहे की एक पंतप्रधान राज्यसभेत राजस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like