भारतात ‘जैश’ घडवू शकतो दहशतवादी हल्ला, सरकारला तपास यंत्रणांनी दिला ‘इशारा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्या जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसांपासून राज्य सरकारांना सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशातच पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या संभाव्य दहशतवादी हल्ल्यांविषयी डार्क वेबकडून संदेश येत आहेत. अनेक गुप्तचर संस्थांनी सरकारला इशारा दिला आहे की जैश-ए-मोहम्मद’ चे अनेक दहशतवादी हे हल्ले करू शकतात. मिलिट्री इंटेलिजेंस, द रिसर्च एंड एनालिसिस विंग (रॉ) आणि इंटेलिजेंस ब्यूरो (आईबी) यांनी सरकारला दहशतवादी हल्ल्यांच्या शक्यतेविषयी विषयी इशारा दिला आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मिलिट्री इंटेलिजेंस, द रिसर्च एंड एनालिसिस विंग (रॉ) आणि इंटेलिजेंस ब्यूरो (आईबी) यापैकी प्रत्येक एजन्सी स्वतंत्रपणे समान निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे. अयोध्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला असून पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता बरीच वाढली आहे.

आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना जातीय सलोखा बिघडवायचा आहे. दहशतवाद्यांचा हल्ला करण्याचा प्रयत्न पूर्वीपेक्षा वेगळा आणि ठाम दिसत आहे. दहशतवाद्यांच्या डार्क वेबमध्ये कोडेड संप्रेषण इतर एजन्सीमध्ये विलीन केले गेले, तेव्हा सुरक्षा संस्था संभाव्य हल्ल्यांचा सामना करण्यासाठी कशी तयारी करावी या निष्कर्षापर्यंत पोहोचले.

दहशतवादी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशला लक्ष्य करू शकतात. 5 ऑगस्टपासून सुरक्षा संस्थांनी हाई अलर्टचा इशारा दिला आहे. . कारण या तारखेला भारतीय संसदेने जम्मू-काश्मीरमधून विशेष राज्याचा दर्जा मागे घेतला होता.

Visit : Policenama.com