‘जैश-उल हिंद’ने स्वीकारली अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी, लिहिले – ‘रोक सकते हो तो रोक लो’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील बंगल्यासमोर संशयास्पद वाहनात स्फोटके ठेवण्याची जबाबदारी जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. जैश-उल-हिंद ने टेलीग्रामच्या माध्यमातून ही घटना घडवून आणल्याचे म्हंटले आहे. या दहशतवादी संघटनेने लिहिले की, “ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है”. दरम्यान, ही तीच संघटना आहे, जिने दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ झालेल्या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती.

दिले खुले आव्हान!

या जैश-उल-हिंद संघटनेने तपास एजन्सीला खुले आव्हान देत लिहिले की, थांबवू शकत असाल तर थांबवा. तुम्ही तेव्हाही काही करू शकला नाही, जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखाली दिल्लीत तुम्हाला हिट केले होते. तुम्ही मोसाद सोबत हात मिळवणी केली होती, पण काहीही झाले नाही.’ दरम्यान, याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 25 जणांची निवेदने नोंदविली आहेत. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस त्या इनोव्हा कारचा शोध लावत आहे ,ज्यात एका व्यक्तीला जाताना पहिले गेले होते. तसेच या दोन्ही गाड्या ज्या मार्गांवरुन गेल्या आहेत, ते शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, परंतु अद्यापपर्यंत कोणताही सुगावा लागला नाही.

दरम्यान, गुरुवारी (25 फेब्रुवारी) संध्याकाळी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँजिलिया बंगल्यासमोर एक संशयास्पद स्कॉर्पिओ कार आढळून आली. त्यांनतर मुंबई पोलीस हरकतीत आले. तपासादरम्यान या कारमध्ये 20 जिलेटीन आणि एक पत्र आढळले. ज्यात अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकीचा मजकूर होता. तसेच गाडीत काही खोट्या नंबर प्लेट्सही आढळल्या.

फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविली गेली कार
पोलिसांनी सांगितले कि, एका आठवड्यापूर्वी स्कॉर्पिओची चोरी करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसून आले आहे की, इनोव्हासह स्कॉर्पिओ कार देखील गुरुवारी पहाटे घटनास्थळी दाखल झाली, त्यांनतर स्कॉर्पिओचा चालक कार तिथेच सोडून दुसर्‍या इनोव्हा गाडीत बसला. त्यानंतर, सीसीटीव्ही फुटेजमध्ये इनोव्हा मुंबईतून बाहेर पडताना आणि ठाण्यात प्रवेश करत असल्याचे दिसून आले. तसेच जिलेटिन कोठून खरेदी केले, याचा देखील पोलिस तपास करीत असल्याचे या अधिकाऱ्यांने सांगितले. ते म्हणाले की, जप्त केलेली स्कॉर्पिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविली गेली आहे.