Delhi Blast : ‘जैश उल हिंद’नं घेतली इस्त्रायली दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील औरंगजेब रोडवरील इस्त्रालय दूतावासाच्या बाहेर काल (शुक्रवार) आयईडीचा स्फोट घडविण्यात आला. या स्फोटाने सुरक्षा यंत्रणांनी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. त्यानंतर आता ‘जैश-उल-हिंद’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

राजधानी दिल्लीतील हा स्फोट अब्दुल कलाम रोडवर झाला. या स्फोटामुळे तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गाड्यांच्या काचाही फुटल्या आहेत. हा स्फोटामागचे कारण समजू शकले नाही. या स्फोटामुळे इस्त्रायल दूतावासाजवळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘जैश-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनेने मेसेजिंग ऍप टेलिग्रामच्या माध्यमातून एक मेसेज पाठविला. त्यामध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिली. ‘सर्वशक्तिमान अल्लाहच्या कृपा आणि मदतीमुळे ‘जैश-उल-हिंद’ सैनिकांनी दिल्लीच्या ‘हाय सिक्युरिटी’ परिसरात घुसखोरी करून IED चा स्फोट घडवून आणला’.

…ही तर एक सुरुवात
टेलिग्रामवरील मेसेजमध्ये दहशतवादी संघटनेने यावर भाष्य केले. त्यामध्ये हा IED चा स्फोट ही तर एक सुरुवात आहे, असे सांगितले. हा स्फोट भारत सरकारने केलेल्या अत्याचारांचा बदल घेईल.