निरा : जयश्री शहा यांचे निधन

नीरा  : पोलीसनामा ऑनलाइन  –   निरा (ता. पुरंदर) येथील जयश्री जंबकुमार शहा ( वय – ८३) यांचे बुधवारी (दि.१७) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या.

नीरा येथील श्री. दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष व वैभव जनरल स्टोअर्सचे मालक मनोज शहा यांच्या त्या मातोश्री होत.