पोलिसांचा खबर्‍या ‘नेंगरू’ बनला जैश-ए-मोहम्मदचा ‘पोस्टर बॉय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यातील एक ट्रक ड्राइवर आशिक अहमद नेंगरू एकेकाळी पोलिसांचा खास होता मात्र पैशांच्या हव्यासापायी तो आता दहशतवादी झाला आहे. आता तो हत्यारे, नशेचे पदार्थ अशा गोष्टींसोबतच दहशतवाद्यांना भारतात स्मगल करण्याचे काम करतो.

नुकतेच पंजाबमध्ये पडलेल्या ड्रोन नंतर भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मदचा नवीन पोस्टर बॉय नेंगरू द्वारा खोऱ्यात पाठवण्यात आलेल्या चाळीसहुन अधिक दहशतवाद्यांना पकडण्यासाठी व्यापक अभियान सुरु केले आहे. नेंगरूने हत्यारांची तस्करी करून भारतात ड्रोनच्या मदतीने हत्यारे पोहचवण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशिक्षित दहशतवाद्यांच्या मार्फत जम्मू काश्मीरमध्ये घातपात करण्याचा प्रयत्न देखील केला.

कधीकाळी भारतासाठी खबरी असलेल्या नेंगरूने अनेक दहशतवाद्यांबाबत माहिती दिली होती. एक चालक असल्यामुळे नेंगरूने काकापोत्रा क्षेत्रामध्ये भारत विरोधी लोकांमध्ये चांगले नेटवर्क प्रस्थापित केले होते. त्यामुळे नेंगरूला श्रीनगरमधील आणि त्याच्या आसपासच्या हल्ल्यातील दहशतवाद्यांची चांगलीच माहिती होती.

नेंगरू हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका नेत्याच्या संपर्कात आला त्यानंतर त्याला भारतविरोधी कारवाया करण्यासाठी अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या. काश्मीरमधील पुलवामामध्ये दगडफेक करण्याची जबाबदारी नेंगरूवर देण्यात आली होती. यासाठी त्याला दोन हजार रुपये मिळायचे. त्यानंतर नेंगरू मुजाहिद्दीनला सोडून आयएसआयचा प्रमुख व्यक्ती झाला.

नेंगरूने पैसे आल्यावर ट्रक खरेदी केले आणि त्याद्वारे तो हत्यारांची स्मगलिंग करू लागला आणि दहशतवाद्यांना ये जा करण्यासाठी देखील मदत करू लागला आणि जैशे सोबत मिळून तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसला.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेंगरूने काश्मीरातील विशेष दर्जा काढल्यानंतर अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला होता आणि हत्यारांची तस्करी देखील केली होती. पंजाब जम्मू सीमेवरील लखनपूर मध्ये सुरक्षा रक्षकाने 12 सप्टेंबर रोजी एका ट्रकमधून चार एके-56 आणि दोन एके-47 रायफल जप्त केल्या होत्या.

अशा अनेक घटनांनंतर एजेंसियोंने आयएसआयचे भांडाफोड केले होते. एनआयए पंजाब आणि काश्मीर पोलीस मिळून सर्व घटनांची तपासणी करत आहेत.

 

Visit : Policenama.com