Jal Jeevan Mission | पीएम मोदी यांनी लाँच केले जलजीवन मिशन अ‍ॅप, पाणी समित्यांशी केली चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jal Jeevan Mission | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रीय जलजीवन कोश आणि जलजीवन मिशन मोबाइल अ‍ॅपिलकेशन लाँच केले (Jal Jeevan Kosh and Jal Jeevan Mission mobile application launched). तसेच यावेळी जलजीवन मिशनबाबत ग्राम पंचायती तसेच पाणी समित्या/ग्रामजल आणि स्वच्छता समित्यांशी (व्हीडब्ल्यूएससी) चर्चा केली. संबंधीतांमध्ये जागरूकता वाढवणे तसेच मिशन अंतर्गत योजनांमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणि जबाबदारी ठरवण्याच्या उद्देशासाठी मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे.

नळकनेक्शनसाठी अ‍ॅपद्वारे आर्थिक मदत करा
राष्ट्रीय जलजीवन कोशधून कुणीही व्यक्ती, संस्था, कंपनी अथवा समाजसेवक, भारतात असो किंवा परदेशात, ते प्रत्येक ग्रामीण कुटुंब, शाळा, आंगणवाडी केंद्र, आश्रमशाळा तसेच इतर सार्वजनिक संस्थांमध्ये नल-जल कनेक्शन प्रदान (Jal Jeevan Mission) करण्याच्या हेतुने मदत करू शकतात.

पीएम मोदी यांनी म्हटले की, पूजनीय बापूजी आणि लाल बहादुर शास्त्रीजी या दोन्ही महान व्यक्तींच्या हृदयात भारतातील गावेच वसलेली होती. मला आनंद आहे की, आज देशभरातील लाखो गावातील लोक ‘ग्रामसभा’च्या रूपात जलजीवन संवाद करत आहेत.

जलजीवन मिशनचे व्हिजन, केवळ लोकांपर्यंत पाणी पोहचवणे नाही. हे विकेंद्रीकरणाचे सुद्धा मोठे आंदोलन आहे. हे गाव संचालित- महिला संचालित आंदोलन आहे. याचा मुख्य आधार, जनआंदोलन आणि जनसहभाग आहे. गांधीजी म्हणत असत की ग्रामस्वराज्याचा खरा अर्थ आत्मबळाने परिपूर्ण होणे आहे. यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत असतो की, ग्राम स्वराज्याचे हे विचार, सिद्धीकडे जावेत.

मागील 70 वर्षात जे काम झाले होते, ते 2 वर्षात केले
आपण असे अनेक चित्रपट पाहिले आहेत, कथा ऐकल्या, कविता वाचल्या ज्यांच्यामध्ये सविस्तर सांगितले जाते की, कशाप्रकारे गावातील महिला आणि मुले पाणी आणण्यासाठी अनेक मैल चालत जातात. काही लोकांच्या मनात गावाचे नाव घेताच हेच चित्र उभे राहते.

परंतु खुप कमी लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की, अखेर या लोकांना रोज पाण्यासाठी नदी आणि तलावावर का जावे लागते, अखेर पाणी या लोकांपर्यंत का पोहचत नाही? मला वाटते की, ज्या लोकांवर मोठ्या कालावधीपर्यंत धोरण ठरवण्याची जबाबदारी होती, त्यांनी हा प्रश्न स्वताला विचारला पाहिजे होता.

स्वातंत्र्यापासून 2019 पर्यंत, आपल्या देशात केवळ 3 कोटी घरातच नळातून पाणी पोहचले.
2019 मध्ये जलजीवन मिशन सुरू झाल्यानंतर, 5 कोटी घरांना पाण्याने जोडले गेले.
आज देशातील जवळपास 80 जिल्ह्यांत सव्वा लाख गावांतील प्रत्येक घरात नळ पोहचवला जात आहे.
म्हणजे मागील 7 वर्षात जे काम झाले होते, आताच्या भारताने केवळ 2 वर्षात त्यापेक्षा जास्त काम करून दाखवले आहे.

मी देशातील त्या प्रत्येक नागरिकांला सांगतो की, पाणी वाचवण्याचा प्रयत्न करा.
पाणी वाया घावण्याची सवय बदलावी लागेल. मागील वर्षात मुलींचे आरोग्य आणि सुरक्षेवर जास्त लक्ष दिले आहे.
घर आणि शाळांमध्ये टॉयलेट, स्वस्त सॅनिटरी पॅड्सपासून गरोदरपणातील पोषण आहारासाठी हजारो रूपयांची मदत
आणि लसीकरण अभियानाने मातृशक्ती आणखी मजबूत झाली आहे.

मी गुजरात राज्यातून आलो आहे जिथे दुष्काळाची जास्त स्थिती मी पाहिली आहे.
मी हे सुद्धा पाहिले आहे की पाण्याच्या एका-एका थेंबाचे किती महत्व असते, यासाठी गुजरातचा मुख्यमंत्री असताना,
लोकांपर्यंत पाणी पोहचवणे आणि जलसंरक्षणाला मी प्राधान्य दिले. (Jal Jeevan Mission)

Web Title :- Jal Jeevan Mission | pm narendra modi interact with gram panchayats and pani samitis on jal jeevan mission and launches jal jeevan mission app

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vishwas Nangare Patil | विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया; भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप

Pune Fire Brigade | Manhole मध्ये कुतुहलमधून वाकून पहायला गेला अन् पडला 15 फुट खोल गटारात; ‘अग्निशमन’च्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर (व्हिडीओ)

Profitable Shares | ’या’ 4 स्टॉक्समध्ये गुंतवा पैसे; अल्पावधीतच व्हाल ‘मालामाल’, ब्रोकरचा अंदाज