केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना, दिवसाला एक रुपया खर्च केल्यावर मिळेल प्रत्येक घराला पाणी

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या सरकारमधील सात निश्चयांमध्ये सामील असणाऱ्या ‘हर घर नल का जल’ या योजनेच्या आधारावर केंद्र सरकार ने देखील प्रस्ताव तयार केला आहे. जल शक्ती मंत्रालयाने सोमवारी हा प्रस्ताव आणला. या योजनेनुसार पाइपद्वारे पाणी पुरविल्या जाणाऱ्या लाभधारकांकडून प्रति दिवशी १ रुपया इतके शुल्क आकारले जाईल.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाणीपुरवठ्यामध्ये फायदा कमावण्याला प्राधान्य दिले जाते. आता केंद्र आणि राज्य सरकार पाणीपुरवठ्यासाठी उपभोगकर्त्याकडून काही शुल्क वसूल करेल. नीती आयोगाच्या बैठकीत मोदी सरकारने पाच वर्षात देशातील प्रत्येक घरात पाईप द्वारे पाणी पोहचवण्याला प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत. याचाच एक भाग म्हणून १ रुपयात प्रत्येक घरी पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. यासाठी जलसंसाधन मंत्रालयाचे नावदेखील बदलून ‘जलशक्ति मंत्रालय’ असे केले आहे.

काय आहे बिहारची ‘हर घर नल का जल’ योजना :
यासाठी केन्द्र सरकार बिहार मॉडेल चा स्वीकार करण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार बिहार मॉडेल मध्ये पाणीपुरवठ्याच्या बदल्यात लोक रोज एक रुपया म्हणजे महिन्याचे ३० रुपये भारतात. पाणीपुरवठ्याच्या या योजनेत ग्राम पंचायत च्या एका वार्ड ला बेसिक यूनिट मानले जाते ज्यात १०० घरे सामील असतात. यामध्ये पाणीपुरवठ्याचा स्रोत भूजल असतो जे बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ट्यूबवेल आणि बोरिंग च्या माध्यमातून याची पूर्ती केली जाते.

बिहारमध्ये २ वर्षांपासून लागू झाली आहे योजना :
‘हर घर नल का जल’ योजना बिहार मध्ये सप्टेंबर २०१६ पासून लागू झाली. ज्यामध्ये पाच वर्षांच्या आत २० मिलियन (दोन कोटी) घरांपर्यंत पाइपच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्याचे लक्ष्य ठरवले गेले होते. आत्तापर्यंत केवळ ०.८ मिलियन घरांपर्यंत हि योजना पोहोचली आहे. सध्या बिहारच्या शहरी आणि ग्रामीण भागात जलपुरवठ्याची गुणवत्ता आणि प्रमाणाच्या संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी चार उप-योजना चालू आहेत.

गंगेच्या मैदानी भागात प्राधान्याने योजना लागू करण्याचा विचार :
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भूजल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या क्षेत्रांमध्ये हि योजना प्रभावीपणे लागू करता येऊ शकते. याठिकाणी भूजलाचे साठे देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंजाब पासून आसामपर्यंत गंगेच्या मैदानी भागातील राज्यांचा समावेश आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय
” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय