Jalgaon ACB Trap | क्राईम मिटींगला येण्याच्या तयारीत असलेले 2 पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, संपुर्ण जिल्ह्यात खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मुलाविरुद्ध दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्हयात इतरांना आरोपी न करण्यासाठी 60 हजार रुपये लाच मागून (Demanding Bribe) तडजोडी अंती 15 हजार रुपये लाच मागणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांच्याविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे. त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव एसीबीने (Jalgaon ACB Trap) सावदा पोलीस ठाण्यात (Savda Police Station) आज (मंगळवार) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड PSI Samadhan Gaikwad (वय-32 रा. सावदा, ता. यावल, जि. जळगाव), सहायक पोलीस निरीक्षक देविदास दादाराव इंगोले API Devidas Dadarao Ingole (वय-52 रा. सावदा, ता. रावेर, जि. जळगाव) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 42 वर्षाच्या व्यक्तीने जळगाव एसीबीकडे (Jalgaon ACB Trap) 30 ऑगस्ट 2022 रोजी तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्या मुलावर सावदा पोलीस ठाण्यात IPC 376 (2) (N), पोस्को कायद्यांतर्गत (POCSO Act) 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारदार यांच्या मुलाला 27 ऑगस्ट रोजी अटक (Arrest) करण्यात आली होती. तक्रारदार हे त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी सावदा पोलीस ठाण्यात गेले होते. तक्रारदार यांनी गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांची भेट घेतली. त्यावेळी गायकवाड यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुमचा मुलगा मुलीला घेऊन ज्यांच्या घरी थांबला होता त्यात तुम्ही स्वत: तुमची पत्नी, भाऊ, बहिण यांना गुन्ह्यात सह आरोपी करणार आहे. सह आरोपी न करण्यासाठी गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे 60 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे 30 ऑगस्ट रोजी तक्रार केली.

जळगाव एसीबी पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी गुन्ह्यात
सह आरोपी न करण्यासाठी 60 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 15 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न
झाले. तसेच सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांनी  गायकवाड याला लाच घेण्यास प्रोत्साहीत केले.
पुढील तपास जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील
(DySP Shashikant Sriram Patil) करीत आहेत.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, पोलीस अधीक्षक सुनील (SP Sunil Kadasane),
अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे (Addl SP Narayan Nyahalde),
वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar), पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachao),
पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील (PSI Dinesh Singh Patil)संजोग बच्छाव,
पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळु मराठे, ईश्वर धनगर, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाणे यांच्या पथकाने केली.

Advt.

क्राईम मिटींगपुर्वीच अडकले एसीबीच्या जाळयात

मंगळवारी सकाळी 10 वाजता जिल्हा पोलिस दलाची मंगलम सभागृहात गुन्हे आढावा बैठक (क्राईम मिटींग) होती.
नवनियुक्त पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतरची ही पहिलीच बैठक होती.
क्राईम मिटींगला येण्याच्या तयारीत असताना लाचखोर गायकवाड आणि इंगोले यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले.

Web Title :-  Jalgaon ACB Trap | 2 police officers (API & PSI) preparing to come to crime meeting in anti-corruption net, excitement in entire district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Koli | मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम भाजपने लावलेला आहे – शरद कोळी

Sushma Andhare | शिंदे गटातील आमदाराचा सुषमा अंधारे टोला, म्हणाले -‘…अंधारात सुद्धा दिसत नव्हत्या’