×
Homeअ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)Jalgaon ACB Trap | 32 हजार रुपये लाच घेताना वैध मापनशास्त्र विभागातील...

Jalgaon ACB Trap | 32 हजार रुपये लाच घेताना वैध मापनशास्त्र विभागातील निरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोलपंपासाठी लागणारे स्टॅम्पिंग प्रमाणपत्र (Stamping Certificate) देण्यासाठी शासकीय फि व्यतिरीक्त 32 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) रावेर येथील वैध मापनशास्त्र विभागातील (Department of Valid Metrology) निरीक्षकाला (Inspector) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. जळगाव एसीबीच्या पथकाने ही कारवाई रावेर येथील एस.एस. बिंबे अँड सन्स या पेट्रोलपंपाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात मंगळवारी (दि.27) केली. सुनील रामंदास खैरनार Sunil Ramandas Khairnar (वय-56 रा.SMIT कॉलेज जवळ, मुक्ताईनगर, जळगाव.ता.जि.जळगांव) असे लाच घेताना रंगेहाथ (Jalgaon ACB Trap) पकडलेल्या निरीक्षकाचे नाव आहे.

 

याबाबत भुसावळ येथील 43 वर्षाच्या व्यक्तीने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Jalgaon ACB Trap) मंगळवारी तक्रार केली. तक्रारदार यांनी रावेर येथील एस.एस.बिंबे ॲण्ड सन्स हा पेट्रोलपंप 11 महीन्याच्या करारावर भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे. या पेट्रोल पंपाच्या 4 झोनल मशीन स्टॅम्पिंग करून सदर स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय फि व्यतिरीक्त 32 हजार रुपयांची मागणी खैरनार यांनी केली.

 

तक्रारदार यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, खैरनार याने तक्रारदार यांचेकडे 32 हजार रुपये लाचेची मागणी (Demand Bribe) केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी एस.एस.बिंबे ऍण्ड सन्स रावेर या पेट्रोलपंपाजवळ (SS Bimbe & Sons Petrol Pump) सापळा रचण्यात आला. पंपाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना सुनील खैरनार याला रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव करीत आहेत.

ही कारवाई ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने (SP Sunil Kadasane),
अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे (Addl SP Narayan Nyahalde),
पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे (Deputy Superintendent of Police Satish Bhamare)
यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस. पाटील (Deputy Superintendent Shashikant S. Patil),
पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव (Police Inspector NN Jadhav),
संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav),
पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील (PSI Dinesh Singh Patil), सुरेश पाटील (PSI Suresh Patil),
पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे,
महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस नाईक जनार्धन चौधरी, किशोर महाजन, बाळु मराठे, सुनिल वानखेडे, महेश सोमवंशी,
ईश्वर धनगर प्रदिप पोळ, राकेश दुसाने, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी.

 

Web Title :- Jalgaon ACB Trap | 32,000 rupees as a bribe, the Inspector of Metrology Department caught in the net of anti-corruption

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Akola ACB Trap | 4 हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा कार्यकारी अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Cabinet Decisions | पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरणार, मंत्रिमंडळ बठकीत महत्त्वाचे 14 निर्णय

Pankaja Munde | भगवान भक्तीगडावर दसर्‍याची जोरदार तयारी, पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन, म्हणाल्या – तयारीला लागा…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News