Jalgaon ACB Trap | तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी 4 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाड्याने दिलेल्या बैलगाड्या (Bullock Carts) परत मिळवून देण्यासाठी बैलगाडा मालकाकडून 4 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यातील (Pimpalgaon Hareshwar Police Station) पोलीस हेड कॉन्स्टेबल (Police Head Constable) आणि चहा टपरी चालकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. जळगाव एसीबीच्या युनिटने (Jalgaon ACB Trap) ही कारवाई मंगळवारी (दि.4) एका चहाच्या टपरीजवळ केली.

पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश दत्तात्रय खोंडे Rakesh Dattatraya Khonde (वय-43 रा.पुनगाव रोड, पाचोरा, ता.पाचोरा, जि.जळगांव), चहा टपरी मालक सुकलाल शांताराम पाटील Suklal Shantaram Patil (वय-46 रा.दत्त कॉलनी, नविन कॉलेजचे मागे, पाचोरा ता.पाचोरा जि.जळगाव) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 30 वर्षाच्या बैलगाडा मालकाने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Jalgaon ACB Trap) मंगळवारी तक्रार केली आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीची बैलगाड्या गावातील एका व्यक्तीला भाडेतत्त्वावर (Lease) दिल्या होत्या.
मात्र त्या व्यक्तीने तक्रारदार यांना बैलगाड्या परत करण्यास आणि भाडे देण्यास नकार दिला.
तक्रारदार यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज दिला होता.
तक्रार अर्जावर (Complaint Application) कारवाई करण्यासाठी राकेश खोंडे याने 5 हजार रुपये लाच मागितली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

जळगाव एसीबी युनिटच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता, खोंडे यांनी तक्रारदार यांच्या अर्जावर कारवाई करण्यासाठी 5 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 4 हजार रुपये स्विकारण्याचे कबूल केले. तसेच लाचेची रक्कम चहाची टपरी चालवणारा सुकलाल पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. पथकाने सापळा रचून पाटील याला राकेश खोंडे यांच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पुढील तपास पोलीस निरीक्षक एस.के बच्छाव करीत आहेत.

ही कारवाई ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने (SP Sunil Kadasane),
अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे (Addl SP Narayan Nyahalde),
पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे (Deputy Superintendent of Police Satish Bhamare)
यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस. पाटील
(Deputy Superintendent Shashikant S. Patil), पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव
(Police Inspector NN Jadhav),, संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav),
पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील (PSI Dinesh Singh Patil), सुरेश पाटील (PSI Suresh Patil) ,
(Police Head Constable Ashok Ahire) पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शैला धनगर,
पोलीस नाईक जनार्धन चौधरी, किशोर महाजन, बाळु मराठे, सुनिल वानखेडे, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर,
प्रदिप पोळ, राकेश दुसाने, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.

Web Title :- Jalgaon ACB Trap | A policeman and a private person caught in the net of anti-corruption while taking a bribe of 4 thousand rupees to take action on a complaint application.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai Accident News | वरळी सी लिंकवर भीषण अपघात, ५ जण जागीच ठार, १० जखमी

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून १७ वर्षाच्या मुलावर तलवार, पालघन, दगडाने मारहाण; दोघांना अटक