Jalgaon ACB Trap | खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पत्रकाराकडून 16 हजार रुपये लाच घेताना पोलिसासह एजंट ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – बोदवड पोलीस ठाण्यात (Bodwad Police Station) दखल असलेल्या खंडणीच्या (Extortion) गुन्ह्यात मदत करण्यासह चॅप्टर केस (Chapter Case) एलसीबीऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी 16 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) पोलीस हवालदारासह (Police Constable) त्याच्या एजंटला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि.25) बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आली. एसीबीच्या (Jalgaon ACB Trap) या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील 28 वर्षाच्या पत्रकाराने (Journalist) जळगाव एसीबीकडे (Jalgaon ACB Trap) तक्रार केली आहे. त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार वसंत नामदेव निकम Vasant Namdev Nikam (वय-52 रा.आयटीआय कॉलनी, जामनेर ता.जामनेर जि.जळगाव.) एजंट एकनाथ कृष्णा बावस्कर (वय-65 रा.जलचक्र बु ॥, ता .बोदवड जि.जळगाव.) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.

यातील तक्रारदार हे पत्रकार असून त्यांच्यावर व त्यांचे इतर 3 पत्रकार मित्र तसेच सामाजिक कार्यकर्ते अशा चौघांविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार वसंत निकम यांचेकडे आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी वसंत निकम यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांना गुन्ह्यात मदत करून ‘ब’ फायनल पाठविण्यासाठी, तसेच दाखल गुन्ह्यातील आरोपींना एलसीबी (LCB) कार्यालय जळगाव येथे चॅप्टरसाठी न पाठवता बोदवड तहसिल कार्यालयात हजर करून चॅप्टर केस करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे 20 हजार रुपये लाच मागितली. तडजोडी अंती 16 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे शुक्रवारी (दि.24) तक्रार दिली.

जळगाव एसीबीच्या पथकाने आज (शनिवार) पंचासमक्ष पडताळणी केली असता वसंत निकम यांनी 20 हजार
रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 16 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार पथकाने बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचला.
मागणी केलेली लाचेची रक्कम निकम यांच्या सांगण्यावरून एजंट एकनाथ बावस्कर यांना स्विकारतांना
रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दोघांवर बोदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार
(DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील
(DySP Shashikant Patil), पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav),
एन.एन. जाधव (Police Inspector N.N. Jadhav) पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील
(PSI Dinesh Singh Patil), पोलीस अंमलदार बाळू मराठे, राकेश दुसाने. सुरेश पाटील, सुनील पाटील,
रविंद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ, सचिन चाटे,
प्रणेश ठाकुर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Jalgaon ACB Trap | Anti-corruption agent caught with police while taking bribe of 16 thousand rupees from journalist to help in extortion crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hasan Mushrif | राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ; पोलिसांत गुन्हा दाखल

Devendra Fadnavis | ब्राह्मण समाज काही मागत नाही हे त्यांचे वैशिष्ट्य – देवेंद्र फडणवीस

Pune Kasba Peth Bypoll Election | पराभव दिसत असल्याने धंगेकर सहानुभूति निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, भाजपचा धंगेकरांवर आरोप (व्हिडिओ)