Jalgaon ACB Trap | 25 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला (No Objection Certificate) देण्याच्या मोबदल्यात 25 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) अमळनेर तालुक्यातील निम ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. राजेंद्र लक्ष्मण पाटील Rajendra Laxman Patil (वय-55 रा.सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे, अमळनेर ता. अमळनेर, जि .जळगाव) असे लाच घेतना पकडण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. जळगाव एसीबीने (Jalgaon ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.23) निम ग्रामपंचायत कार्यालयात (Nim Gram Panchayat Office) केली.

याबाबत अमळनेर तालुक्यातील निम येथील 27 वर्षाच्या व्यक्तीने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Jalgaon ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांचा मागील अनेक वर्षापासून निम ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये विटभट्टी व्यवसाय आहे. तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे अमळनेर तहसील (Amalner Tehsil) कार्यालयात त्यांच्या नावाने 6 हजार रुपये रॉयल्टी भरलेली आहे. तरी सुद्धा तक्रारदार यांना राजेंद्र पाटील यांनी निम गावच्या ग्रामपंचायत हद्दीत जर विटभट्टी व्यवसाय करायचा असेल तर ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल असे सांगितले. निम ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक राजेंद्र पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे 27 हजार 500 रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीच्या कार्यालयात तक्रार दिली.

जळगाव एसीबीच्या पथकाने 17 जानेवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, राजेंद्र पाटील यांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे 27 हजार 500 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी निम ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचून लाचेची मागणी केलेल्या रक्कमेपैकी 25 हजार रुपये रोख रक्कम पंचासमक्ष स्विकारतांना रंगेहात पकडले. राजेंद्र पाटील यांच्यावर मारवड पोलीस स्टेशन (Marwad Police Station) येथे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार
(DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील
(DySP Shashikant Patil), पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav),
एन.एन. जाधव (Police Inspector N.N. Jadhav)पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील,
पोलीस अंमलदार ईश्वर धनगर, प्रदिप पोळ, सचिन चाटे, सुनील पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी,
किशोर महाजन, बाळु मराठे, सुनिल वानखेडे, महेश सोमवंशी, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.

Web Title :- Jalgaon ACB Trap | Gram sevak in anti-corruption net while accepting bribe of 25 thousand rupees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narayan Rane | वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीवर नारायण राणे यांचा ‘प्रहार’; म्हणाले…

Pune Crime News | चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून 5 लाखांचा गंडा, 3 जणांविरुद्ध FIR; विमानतळ परिसरातील घटना

Diarrhea in Children | मुलांच्या डायरियाच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या 5 लक्षणे आणि उपचार