Jalgaon ACB Trap | झोनल मशीनचे स्टॅम्पिंग करुन देण्यास लाच मागणारा निरीक्षक अटकेत; पाचोरा तालुक्यातील घटना

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल पंपाच्या झोनल मशिनचे स्टॅम्पिंग करुन प्रमाणपत्र देण्यासाठी निरीक्षकाने 6000 रुपये लाच (Jalgaon ACB Trap) मागितली आणि स्वीकारल्याच्या प्रकार पाचोरा तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पेट्रोल पंप मालकाने तक्रार दिली होती. त्यानुसार विभागाने सापळा रचत ही कारवाई (Jalgaon ACB Trap) केली आणि लाचखोर निरीक्षकाला ताब्यात घेतले आहे.

 

तक्रारदार यांच्या मालकीचा जय बालाजी पेट्रोलीयम नावाने पहुरमध्ये पेट्रोलपंप आहे. त्यांच्याजवळ चार झोनल मशीन आहेत. यांची वैधता संपली होती. त्यामुळे त्यांची स्टॅम्पिंग करुन प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्यांनी वैद्यमापन शास्त्र विभागास अर्ज केला. पण येथे उपस्थित निरीक्षक विवेक सोनू झरेकर (वय – 54, रा. पुनगाव रोड, ता.पाचोरा, जि.जळगाव) यांनी प्रत्येक मशीनसाठी 1500 प्रमाणे चार मशीनचे 6000 रुपये मागितले. या प्रकाराची तक्रार लाच लुचपत प्रथिबंधक विभागाला करण्यात आली त्यानुसार विभागाने सापळा रचला आणि झरेकर यांनी 6000 रुपये लाचेची रक्कम पंचासमोर पहुर ते जळगाव रोडवरील हॉटेल अजिंक्य येथे स्वीकारली. झरेकर यांनी जागीच अटक करण्यात आली.

 

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे,
वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा तपास अधिकारी
पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस.पाटील यांनी पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव आणि
पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव यांच्या मदतीने केली. तसेच यावेळी पोलीस नाईक ईश्वर धनगर, पोलीस हवालदार राकेश दुसाने, आणि सचिन चाटे उपस्थित होते.

 

Web Title :- Jalgaon ACB Trap | Inspector arrested for demanding bribe to stamp zonal machine; Incidents in Pachora Taluka

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत