Jalgaon ACB Trap | पत्त्यांचा क्लब सुरु ठेवण्यासाठी 4 हजार रुपये लाच घेताना तीन पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पत्त्यांचा कल्ब सुरु ठेवण्यासाठी चार हजार रुपये लाच घेणाऱ्या (Accepting Bribe) यावल तालुक्यातील फैजपूर येथील तीन पोलिसांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Jalgaon ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.24) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली. जळगाव एसीबीच्या पथकाने (Jalgaon ACB Trap) केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
हेमंत वसंत सांगळे Hemant Vasant Sangle (वय 52, रा. भारत एंटरप्रायजेस मागे, फैजपूर), किरण अनिल चाटे Kiran Anil Chate (वय 44, रा. विद्या नगर, फैजपूर) आणि महेश ईश्वर वंजारी Mahesh Ishwar Vanjari (वय 38 रा.लक्ष्मी नगर, फैजपूर) अशी या लाचखोर पोलिसांची नावे आहेत.
तक्रारदार यांचा बामणोदला पत्त्यांचा क्लब आहे. या क्लबवर कारवाई न करण्यासाठी संबंधित बीट हवालदार
यांनी चार हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी
जळगाव एसीबीकडे (Jalgaon ACB Trap) तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता
लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सापळा रचला. त्यावेळी बीट हवालदार सांगळे
व चाटे यांनी तक्ररादार यांच्याकडे चार हजार रुपये लाचेची मागणी केली. यातील एक हजाराची रक्कम वंजारी यांनी घेतली. ही रक्कम घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिघांना अटक केली.
ही कारवाई जळगाव विभागाचे पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव (PI N.N. Jadhav),
सहायक फौजदार सुरेश पाटील (PSI Suresh Patil), पोलीस अंमलदार अशोक अहिरे, सुनिल पाटील, रवींद्र घुगे,
शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळु मराठे, प्रदीप पोळ, सचिन चाटे,
अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली.
Web Title :- Jalgaon ACB Trap | Three cops caught in anti-corruption net while taking Rs 4,000 bribe to keep cards club going
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update