×
Homeक्राईम स्टोरीJalgaon Accident News | जळगावमध्ये भीषण अपघात ! डॉक्टर मित्रांचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident News | जळगावमध्ये भीषण अपघात ! डॉक्टर मित्रांचा जागीच मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Jalgaon Accident News | जळगाव जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन डॉक्टर मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. अमळनेरहून शिरपूरकडे जाणाऱ्या बुलेटला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली आहे. काल दुपारी अमळनेर बेटावद रस्त्यावरील हॉटेल माधवी (Hotel Madhavi) जवळ हा भीषण अपघात झाला आहे. डॉ. महेंद्र शांतीलाल बोरसे (Dr. Mahendra Shantilal Borse) व डॉ. अरुण नथ्थू साळुंखे (Dr. Arun Natthu Salunkhe) अशी या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. (Jalgaon Accident News)

 

काय घडले नेमके ?
डॉ. महेंद्र बोरसे आणि डॉ. अरुण नथ्थू साळुंखे हे शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास बुलेट क्रमांक (एमएच १८ एव्ही ३११) ने अमळनेर-बेटावद रस्त्याने शिरपूरकडे जात होते. यादरम्यान ब्राम्हणे फाट्याजवळील हॉटेल माधवी जवळ समोरून येणारी शिरपूर-अमळनेर बस क्रमांक (एमएच २० बीएल ३९८१) ने बुलेटला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि या अपघातात बुलेटवरील डॉ. महेंद्र बोरसे आणि डॉ. अरुण साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला. (Jalgaon Accident News)

ही बस दुसऱ्या बसला ओव्हरटेक (Overtake) करत असताना हा भीषण अपघात झाला आहे.
याप्रकरणी रविंद्र जगन्निा मिस्तरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार किशोर पाटील (Assistant Police Officer Kishore Patil) या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
डॉ. महेंद्र बोरसे यांच्या माघारी आई वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ तर अरुण साळुंके
यांच्या माघारी आई वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे.

 

Web Title :- Jalgaon Accident News | bullet going to shirpur hit by bus two doctor friends died on the spot in jalgaon crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PFI च्या ‘आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा नाहीच; पुणे पोलिसांचा खुलासा

Shambhuraj Desai | ‘आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करावा की…’ शंभूराज देसाईंचा ‘गद्दार’ शब्दावरुन अजित पवारांना इशारा

Pune Police | पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News