Jalgaon Bhusaval News | भुसावळमध्ये भाजपच्या तब्बल 30 नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Bhusaval News | विधान परिषदेच्या निवडणुकीत 6 पैकी 4 जागा जिंकून भाजपने (BJP) महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) धक्का दिला. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपचा बालेकिल्ल्याला मोठे भगदाड पाडले आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये (Jalgaon Bhusaval News) भाजप नगराध्यक्षासह 30 नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) भुसावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत भाजपचे नगरसेवकांनी (BJP corporator) राष्ट्रवादीत प्रवेश केला. भुसावळच्या भाजप नगराध्यक्षांसह 22 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तसेच सावदा नगरपरिषदेच्या (Savda Municipal Council) भाजप नगराध्यक्षा अनिता येवले (Anita Yewale) यांच्यासह 8 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी या नगरसेवकांसह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. (Jalgaon Bhusaval News)

 

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून भाजपला मोठी गळती लागली आहे. जळगावमध्ये महिना-दोन महिन्यांनी भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. जळगावच नाहीतर राज्यभरात ठिकठिकाणी भाजपचे नगरसेवक आणि नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

 

माजी आमदार संजय पवार राष्ट्रवादीत
दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) नांदगावमधील भाजपचे माजी आमदार संजय पवार (Former MLA Sanjay Pawar)
यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)
यांच्या उपस्थितीत येवल्यात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मालेगाव तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

 

Web Title :- Jalgaon Bhusaval News | 30 bjp corporators joined ncp in the presence of ajit pawar in bhusawal jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam | टीईटी परीक्षेत कोट्यवधींची उलाढाल ! तुकाराम सुपेंच्या घरातून 90 लाखांचा ऐवज जप्त – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (व्हिडीओ)

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ लागणार? परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले…

 

Ananya Panday Hot Photos | अनन्या पांडेच्या ‘या’ फोटोनं सोशल मीडियावर लावली आग, फोटो पाहून चाहते झाले घायाळ