पोलिस कर्मचार्‍याची ‘गळफास’ घेऊन ‘आत्महत्या’

चोपडा (जळगाव) : पोलिसनामा ऑनलाइन – गुन्ह्यांचा छडा लावणारे आणि सगळ्यांच्या सुरक्षा म्हटलं की पोलीस आठवतात असच गुन्ह्याचा शोध लावणाऱ्या पोलिसानेच गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. पोलिसाची जबाबदारी नागरिकांची सुरक्षा करन ही आहे. पोलीस हे सामान्य नागरिकांच रक्षण करतात. पोलिसाच्या हि खासगी आयुष्यात अनेक अडचणी असतात. मात्र ते आपल्या अडचणी बाजूला ठेऊन आपल्या कमप्राप्ती एकनिष्ठां असतात. पण काही वेळा आयुष्यातील तणाव पोलिसाच्या जीवावर बेततो.

जळगाव जिल्ह्यातील चोपडामध्ये याच तणावातून एका तरुण पोलिसाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पंकज मोहन पाटील असं या पोलिसाचं नाव आहे. 27 वर्षीय पंकज चोपडा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी कौंटुंबिक कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पंकज पाटील यांची कौटुंबिक स्थिती फारशी चांगली नव्हती. घरात सतत भांडणे होत होती आणि यामुळे पंकज पाटील यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. याच कारणांनी नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली आहे असे समजले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपस करत आहेत .

दिवसेंदिवस मानसिक तणावातून पोलिसांच्या होत असलेल्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलिसांना कामचे अधिकचे तास, कामाचं टेन्शन आणि शारीरिक आणि मानसिक हि त्रास होतो. कामासोबत त्याना कौटुंबिक अडचणींना हि सामोरे जात असताना बऱ्याचदा असे टोकाचे निर्णय घेतले जातात.

You might also like