Jalgaon Crime | शर्यतीने घेतला चिमुकल्याचा बळी, कारच्या धडकेत जळगावमध्ये 11 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Crime | जळगाव शहरातील मेहरुण ट्रॅकवर दोन कारमध्ये लागलेली शर्यत (Car Race) एका चिमुकल्याच्या जीवावर बेतली आहे. कारने दिलेल्या धडकेत सायकलस्वार चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. कारची धडक इतकी भीषण होती की सायकलस्वार मुलगा 15 फुट वर फेकला जाऊन खाली पडला तर त्याची सायकल झाडावर (Car Accident in Jalgaon) अडकली. विक्रांत संतोष मिश्रा Vikrant Santosh Mishra (वय – 11) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे मेहरुण तलाव (Mehrun Lake) परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी (MIDC Police) कार चालक मुलांसह कार मालकाला ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना (Jalgaon Crime) रविवारी (दि.28) सायंकाळी घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रांत मिश्रा हा त्याचा चुलत भाऊ सुनील जितेंद्र मिश्रा (Sunil Jitendra Mishra) याच्यासोबत मेहरुण तलावाकडे फिरायला गेला होता. त्यावेळी मास्टर कॉलनीतील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा कार घेऊन शिकवण्यासाठी मेहरुण तलावाकाठी गेला होता. त्याच्या मित्राचीही कार या ठिकाणी होती. दोन्ही मुलांची कारची शर्यत लावली. त्यात (एमएच. 19 बी. यू. 6006) या कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रांतला जोरदार धडक दिली. यात विक्रांत चेंडूसारखा 15 फूट वर फेकला जाऊन खाली पडला. यात त्याच्या डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. (Jalgaon Crime)

अपघातानंतर कारमधील मुलांनी विक्रांतला रुग्णालयात घेऊन गेले.
त्यावेळी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
विक्रांत हा मिश्रा परिवारातील एकुलता एक मुलगा होता.
याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी पडताळणी करुन त्यांच्यासह गाडी मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
विक्रांत मेहरुण जलतरण तलाव समोरील विद्या इंग्लिश स्कूलमध्ये (Vidya English School) इयत्ता चौथीत शिकत होता.
त्याचे वडिल जळगाव साऊंड असोसिएशन संघटनेचे (Jalgaon Sound Association) सहसचिव म्हणून काम करतात.

 

Web Title : –  Jalgaon Crime | a race between two cars killed a child jalgaon accident crime news

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा