Jalgaon Crime | जळगावमधील धक्कादायक घटना; लग्नाचे आमीष दाखवून डॉक्टर तरुणीवर परिचारकाकडून अत्याचार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Crime | जळगाव शहरातील (Jalgaon Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका परिचारकाने डाॅक्टर तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या परिचारकाचा विवाह झाल्यानतंरही तरुणीने विरोध करुनही तिला जळगावात आणून हातपाय बांधून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. पिडित तरुणीने फिर्याद दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. मात्र, आरोपी परिचारक फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संपत लक्ष्मण मल्हाड (Sampat Laxman Malhad) (मुळ रा. दरिबडची, ता. जत, जि. सांगली) जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (jalgaon government medical college) आणि रुग्णालयात परिचारक म्हणून कार्यरत आहे. तर, पिडीत तरुणी उस्मानाबाद येथे नर्सिंग कॉलेजला (osmanabad nursing college ) नोकरीस असताना प्रशिक्षणासाठी सांगली (Sangli) येथे गेली होती. या दरम्यान तीची संपतशी ओळख झाली. त्यावेळी संपतने तीला लग्नाचे आमीष देवून तीच्यावर अत्याचार (Jalgaon Crime) करण्यास सुरुवात केली. त्यानतंर संपतने अनेकवेळा तीच्याकडून पैसे देखील घेतले. तर, अत्याचारातून तरुणी गर्भवती झाल्याने त्याने तीला जळगावात बोलावून पाळधी येथील एका रुग्णालयात गर्भपात करवून घेतला. विशेष म्हणजे त्याचे लग्न झाले असल्याने पिडितेनं त्याचे संबंध तोडले.

त्यानंतर, लग्न झाल्यानतंरही संपतने तीच्या गावी जाऊन प्रेमसंबधाबाबत लोकांना सांगण्याची धमकी दिली.
या धमकीला घाबरुन तरुणी त्याच्या सोबत संपर्कात राहत होती. संपत तिला भेटण्यासाठी आग्रह करत होता.
2020 साली औरंगाबादमध्ये बोलावून घेत पुन्हा अत्याचार केले. यानंतर 6 सप्टेबर 2021 रोजी संपतने तरुणीस जळगावात बोलावून घेतले.
पांडे डेअरी चौकातील मैत्रीणीच्या रुमवर घेऊन गेला. तेथे त्याने थेट हात-पाय बांधून तीच्यावर अत्याचार केला.
तसेच तीला ठार मारण्याची धमकी देखील दिली. नंतर तिला तिच्या बीड या मुळ गावी सोडून आला.
अखेर त्या तरुणाने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी अधिक तपास एपीआय प्रमोद कठोरे (API Pramod Kathore) करीत आहेत.

Web Title :- Jalgaon Crime | a young doctor from beed was raped by a male nurse in jalgaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court | फसवणूक प्रकरण ! मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंचा जामीन फेटाळला; कुटुंबियांनी कॉसमॉस बँकेचे साठ कोटींचे कर्ज थकवले

Pune Crime | कोंढव्यात महावितरण कर्मचाऱ्याला कार्यालयात येऊन जीवे मारण्याची धमकी, महिलेसह तिघांवर FIR

Pune News | जबरदस्तीने धर्मांतरास ‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’चा विरोध