Jalgaon Crime | दुर्देवी ! जळगाव जिल्ह्यात 4 जणांचा बुडून मृत्यू; सख्खे भाऊ आणि चुलत भाऊ-बहिणीचा समावेश

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  Jalgaon Crime | जळगाव जिल्ह्यात काल (रविवारी) अंनत चतुर्थी दिवशी दोन वेगवेगळ्या घटना घडलेल्या समोर आल्या आहेत. या घटनेत 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू (Died) झाला आहे. जामनेर तालुक्यातील (Jamner taluka) जांभुळ येथे चुलत भाऊ-बहिणीचा मृत्यु झाला. तर, चाळीसगावातील वाघळी (Chalisgaon Waghli) येथे सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. यामुळे (Jalgaon Crime ) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी, जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील रहिवासी असलेले नितीन एकनाथ जोशी व गोरख एकनाथ जोशी हे दोन्ही भाऊ भिक्षुकी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
रविवारी ते वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी शेंगोळा येथे गेले होते.
दुपारच्या सुमारास नितीन यांची मुलगी पायल नितीन जोशी (वय, 9) आणि गोरख यांचा मुलगा रुद्र गोरख जोशी (वय 6) हे घराजवळ एकत्र खेळत होते.

खेळता-खेळता दोघे जण जांभूळ गावाजवळ असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यापर्यंत गेले.
त्याठिकाणी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती दोघांच्या आई-वडिलांना समजली.
त्यानंतर जोशी कुटुंबीयांनी गावाकडे धाव घेतली.
सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह केटीवेअरच्या पाण्यात बाहेर काढण्यात आले.
रात्रीच्या सुमारास दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तर दुसरी घटना म्हणजे, चाळीसगाव तालुक्यात असलेल्या वाघळी या गावी पोहायला गेलेले २ सख्खे भाऊ बुडून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली.
वाघळी गावालगत असलेल्या तितूर नदीपात्रातील कमळेश्वर केटी वेअरजवळ आयान शरीफ शहा (वय, 17) व साहिल शरीफ शहा (वय, 14) हे दोघे भाऊ पोहायला गेले होते.
पोहत असताना त्यांना खोल पाण्याच्या अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडून गेले.
याबाबत माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
यातील आयान याचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या भावाचा शोध सुरु आहे.

 

Web Title : Jalgaon Crime | four drowned in jalgaon district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrakant Patil | ‘मुश्रीफ यांनी ड्रामा बंद करावा’ – चंद्रकांत पाटील

Pune Crime | पिंपरीत स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट, पोलिसांकडून पर्दाफाश, 4 तरुणींची सुटका

Goa Accident | गोव्याच्या खाडीत कार बुडून भीषण अपघात ! पुण्यातील शुभम देडगे व ईश्वरी देशपांडेचा मृत्यू