Jalgaon Crime | अनैतिक संबंधातून महिलेचा निर्घृण खून

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  Jalgaon Crime | अनैतिक संबंधातून एका भाजीविक्रेत्या महिलेचा एकाने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रामेश्वर कॉलनीतील तुळजामातानगर परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. वंदना गोरख पाटील (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. सुरेश सुकलाल महाजन (मूळ रा. माळीवाडा, चोपडा, ह. मु. रामेश्‍वर कॉलनी) असे अटक (Jalgaon Crime) केलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वंदना पाटील या १ जूनपासून पुंडलिक वंजारी यांच्या घरात भाड्याने रहात होत्या. त्यांच्या पतीनचे १०-१५ वर्षापूर्वीच निधन झाले आहे.
तर त्यांचा मुलगा दीपक हा नोकरीनिमित्त पत्नीसह लातूर येथे वास्तव्यास आहे.
वंदना पाटील या एकट्याच घरी राहत होत्या. शुक्रवारी सकाळी शेजारी राहणारा कुणाल पाटील याला वंदनांच्या घराचा दरवाजा १० वाजले तरी बंद असल्याचे लक्षात आले.
त्याने त्यांचा दरवाजा ढकलला असताना त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले.
त्याने याबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी धाव घेत पाहणी केली.
प्राथमिक अंदाजानुसार महिला झोपेत असताना, अज्ञात व्यक्तीने डोक्यात व पोटात धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले.

दरम्यान, तपासात सुरेश महाजन आणि वंदना पाटील यांचे संबंध असल्याची माहितीसमोर आली.
अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद,
मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील यांचे पथक चोपडा येथे रवाना केले.
चोपडा येथून तीन किलोमीटर अंतरावरील महादेव मंदिर परिसरात लपून बसलेल्या सुरेशला पोलिसमित्र मुख्तार शेख सरदार याच्या मदतीने निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे,
रतिलाल पवार, राजेंद्र कांडेलकर यांनी अटक केली.

 

सुरेश आणि वंदना यांचे अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते. वंदनाच्या मुलाचे लग्नही लावून दिले.
मात्र, गेल्या काही दिवसापासून वंदनाचे दुसरीकडे सूत जुळले होते. त्यामुळे ती नेहमी सुरेशला
टाळत होती. गुरुवारी सुरेश वंदना यांच्या घरी गेला होता.
त्यावेळी जेवण वाढण्यावरून दोघांमध्ये वाद झाला.
या वादातून सुरेशने वंदनाच्या डोक्यात एक किलोचे वजन मारले.
कांदे कापण्याच्या सुरीने तिच्या पोटात वार केले.
नंतर तिला दरवाजाच्या भिंतीला फासावर लटकावल्याची कबुली सुरेशने दिली.

 

Web Title : Jalgaon Crime | jalgaon city vegetable seller woman murder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने 19 वर्षाखालील मुलांसाठी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Pune News | मतदार कमी असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये निवडणूका घेण्याचा निर्णय – अजित पवार

Jan Ashirwad Yatra | उन्होंने हवा कर दी सर ! जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेंना बड्या नेत्याचा ‘कॉल’, बातचीत व्हायरल