Jalgaon Crime | पोलीस निरीक्षक कीर्तनस्थळी बूट घालून, कार्यक्रम केला बंद; संतप्त वाकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

जळगाव : पोलीसनाम ऑनलाइन – Jalgaon Crime | जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात (Chalisgaon city) एका पोलीस निरीक्षकाने कीर्तन समारंभात येऊन कीर्तन बंद (Stop Kirtan) केल्यावरुन वाद निर्माण झाला आहे. चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग राजपूत नगर येथील सप्तश्रृंगी मंदिराजवळ (Saptashrungi Temple) रात्री माईक आणि स्पिकर लावून कीर्तन सुरु होते. त्यावेळी शहर पोलीस निरीक्षक के.के.पाटील (Police Inspector KK Patil) हे त्याठिकाणी आले आणि कीर्तनाचा कार्यक्रम बंद पाडला. एवढेच नाही तर ते बूट घालून नारदाच्या गादीवर (Narad Gadi) चढले. यामुळे वारकरी (Warkari) नाराज झाले असून वारकरी संप्रदायाने राज्यव्यापी आंदोलन (Agitation) छेडण्याचा (Jalgaon Crime) इशारा दिला.

 

पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी कीर्तनाच्या कार्यक्रमात येऊन कार्यक्रम बंद केला. तसेच त्यांनी वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले. यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. वारकरी संप्रदायात श्रद्धेचा विषय असलेल्या आणि कीर्तनकार ज्या ठिकाणी उभे राहून ध्यान करतात त्या जागेला नारदाचे सिंहासन म्हटले जाते. त्याच जागेवर के.के पाटील बूट घालून चढले. तसेच वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. (Jalgaon Crime)

 

पोलीस निरीक्षकांचा नारदाच्या सिंहासनावर बूट घालून चढल्याचा फोटो सोशल मीडियात (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे.
रात्री 10 वाजून गेल्यानंतरही कीर्तन सुरु होते.
परंतु पोलीस निरीक्षकांची वागणुकीची पद्धत चुकीची होती, असा आरोप वारकरी संप्रदायातील मंडळींनी केला आहे.
पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या वागणुकीमुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या (Warkaris Hurt Feelings) आहेत.
त्यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशारा वारकऱ्यांनी दिला आहे.

 

Web Title :- Jalgaon Crime | jalgaon police inspector stopped kirtan and hurt warkaris to stand on narad gadi with shoes in chalisgaon news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Navneet Rana – MLA Ravi Rana | राणा दाम्पत्यानं केली न्यायालयास विनंती, म्हणाले – ‘आम्हाला घरचं जेवण द्या, खाण्याची आबळ होतेय’

 

Manisha Kayande on Raj Thackeray | ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी…’; मनीषा कायंदेंची राज ठाकरेंवर टीका!

 

Maharashtra Cabinet Decisions | पुण्यातील येरवडा येथे नवीन ITI सुरु करण्यास मंत्रिमंडळाची मंजूरी