Jalgaon Crime | तब्बल 8 महिन्यानंतर आत्महत्येमागील कारण आले समोर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Jalgaon Crime | आठ महिन्यांपूर्वी जळगाव तालुक्यातील धानवड शिवारात अल्पभूधारक शेतकरी सुकलाल घोडके (वय 51) यांनी आत्महत्या (Jalgaon Crime) केली होती. मात्र या आत्महत्येमागील (Suicide) खरे कारण आता समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुकलाल घोडके यांनी लिहिलेली सुसाईड नोट (Suicide note) तब्बल आठ महिन्यांनी कुटूंबियांना सापडल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडित कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. चिठ्ठीची खातरजमा करून एमआयडीसी पोलिसांत (MIDC Police) शेत विकायला भाग पाडणारा दलाल आणि सावकार अशा दोघांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (FIR) दाखल झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 19 जानेवारीला सुकलाल घोडके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पत्नी शोभा घोडके यांनाही पतीच्या मृत्यूनंतर खासगी नोकरी करावी लागली. तर, मुलगा हर्षल मिळेल ते काम करुन कुटुंबीयांना मदत करतो. पतीचा मृत्यू होऊन आठ महिने लोटले असताना अचानक सुटीच्या दिवशी शोभा घोडके घराची झाडपूस आणि साफसफाई करत असताना पतीच्या कपाटातील जुने कपडे काढत असताना आधारकार्डसह काही चिटोऱ्या, बिल मिळून आले. त्यात वहीच्या पानावर लाल पेनाने लिहिलेली चिठ्ठी मिळाली.

तिचा एक तुकडा कुठेतरी हरवला मात्र, अर्धा फाटलेल्या या चिठ्ठीतील ‘मायना’ वाचल्यावर घोडके कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. घोडके कुटूंबीय सुकलाल यांनी ताण तणावातून आत्महत्या (Suicide from stress) केल्याचे समजत होते. मात्र चिठ्ठीतील मजुकराने त्यांच्या मृत्यूचे सत्य समोर आले. शोभा घोडके आपल्या मुलाला घेऊन तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गेल्या. त्यांनी सापडलेली चिठ्ठी पोलिसांना दिली. पोलिसांनी गांभीर्य ओळखत चिठ्ठीची खातरजमा करून शेत विक्रीचा सौदा करणारा दलाल प्रकाश माळी व न दिलेल्या दोन लाखांवर व्याज आकारणारा सावकार शैलेंद्र वसंत चिरमाडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

हे देखील वाचा

Maharashtra BJP | महाराष्ट्रातील भाजपची दिल्लीत खलबते; चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ फडणवीस, दरेकरही दिल्ली दरबारी

Cyber Crime In Maharashtra | काय सांगता ! होय, थेट पोलीस आयुक्तांचे Fake अकाउंट काढून पैशांची केली मागणी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Jalgaon Crime | jalgaon six months after found suicide note farmer found known reason

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update