Jalgaon Crime | जळगावमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशीच अत्यंत दुर्देवी घटना ! पतंगांनी घेतला 2 लेकरांचा जीव

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Crime | जळगावमध्ये आज मकर संक्रांतीच्या सणा (Makar Sankranti) दिवशीच दोन दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. पंतगांच्या नादात दोन मुलांना आपला प्राण गमवावा लागला आहे. एक घटना म्हणजे पतंग उडवण्यासाठी (Playing Kites) जाऊ दिलं नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. तर, दुसरी घटना म्हणजे पतंग उडवताना विजेच्या तारांचा धक्का लागल्याने 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू (Died) झाला. आहे. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या आहेत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जातेय.

याबाबत माहिती अशी, जळगाव शहरापासून (Jalgaon News) काही अंतरावर असलेल्या कुसुंबा गावामध्ये (Kusumba) पतंग उडवत असताना विजेचा शॉक लागून हितेश ओंकार पाटील (Hitesh Omkar Patil) (वय. 8) याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हितेशचं पतंग विजेच्या तारांवर अडकलं होतं. ते पतंग काढताना त्याला विजेचा शॉक लागला असल्याची माहिती समोर आली आहे. (Jalgaon Crime)

दरम्यान, जळगाव शहरातील कांचननगरात (Kanchan Nagar) येथे पतंग उडवण्यासाठी जाऊ दिले नाही म्हणून यश रमेश राजपूत (Yash Ramesh Rajput) (वय. 14) या मुलाने झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suiicde in Jalgaon) केली आहे. या दोन्ही दुर्देवी घटनानंतर दोन्ही कुंटूंबीयाच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

Web Title : Jalgaon Crime | kites took lives two child unfortunate incident took place jalgaon makar sankranti 2022 crime news today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात