Jalgaon Crime | सगळे गाढ झोपले असताना वडिलांनी घेतला गळफास

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Jalgaon Crime | जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कुटूंब घरात झोपलेले असताना बाहेर वेल्डींग दुकानाच्या शेडमध्ये संजय नारायण मिस्त्री (Sanjay Narayan Mistry) यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide News) केली आहे. हि घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. दरम्यान, संजय नारायण मिस्त्री यांचा मुलगा पहाटे साडे पाच वाजता व्यायाम करण्यासाठी उठला असता त्याला वडिलांनी गळफास (Jalgaon Crime) घेतल्याचे दिसून आले.

 

हाती आलेल्या माहितीनुसार, संजय मिस्त्री हे वेल्डिंगचे कामे करायचे. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर पत्नी सविता, मुलगा राकेश व नितीन असे रात्री 12 वाजता झोपले तर संजय हे घराच्या बाहेर झोपले होते. पहाटे साडे पाच वाजता मुलगा राकेश व्यायाम करण्यासाठी तर लहान नितीन पाण्याचे हिटर लावण्यासाठी उठला असता त्यांनी वडिलांनी गळफास (Jalgaon Crime) घेतल्याचे दिसून आले.

 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला पण तिकडे वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे (Dr. Sachin Ahire) यांनी संजय यांना मृत घोषित केले.
एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्याचे हवालदार अल्ताफ पठाण (Constable Altaf Pathan) व शुध्दोधन ढवळे (Shudhodhan Dhawale) यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
संजय यांच्या माघारी पत्नी सविता, राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परिवार आहे.
याबाबत एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

Web Title :- Jalgaon Crime | man suicide news jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bhumi Pednekar | भूमी पेडणेकरच्या ‘या’ मोहक फोटोंमुळे चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

Pune Corporation | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील चोरीला गेलेले ‘स्पिकर’ 18 लाखांचे; बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

BJP MLA Atul Bhatkhalkar | ‘सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून परमबीर सिंह आणि शिवसेनेचं साटंलोटं असल्याचं सिद्ध, चौकशी CBI कडे सोपवा’