Jalgaon Crime | खळबळजनक ! अल्पवयीन मुलीला पळवून नेत कारमध्ये केला बलात्कार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एका अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पळवून नेत तिच्यावर कारमध्ये बलात्कार (Rape) केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Crime) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Crime) जामनेर तालुक्यातील (Jamner Taluka) पहूर (Pahur) येथे घडली आहे. आरोपीने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात (Pahur Police Station) एकावर सोमवारी (दि.21) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

गणेश शांताराम पवार (Ganesh Shantaram Pawar) असे नराधामाचे नाव आहे. आरोपी गणेश पवार फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात 18 मार्च रोजी गणेश पवार याने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळून जाऊ, असे सांगून त्याच्या पांढऱ्या रंगाच्या इको गाडीत (Echo Car) बसवले. त्यानंतर एका गावाजवळील रस्त्याजवळ गाडी थांबवली.

 

आरोपी गणेश पवार याने गाडी थांबवून अल्पवयीन मुलीवर गाडीतच अत्याचार केले, असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पहूर पोलीस ठाण्यात गणेश पवार याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे (PSI Sandeep Chede) करत आहेत.

 

Web Title :- Jalgaon Crime | minor girl raped in car accused absconding in jamner of jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gopichand Padalkar | ‘शरद पवारांनी राहुल गांधींची जी अवस्था केली, तशीच संजय राऊतांना आदित्य ठाकरेंची करायचीय’ – गोपीचंद पडळकर

 

Low Carbs For Diabetes | डायबिटीजचे रूग्ण बिनधास्त खाऊ शकतात ‘या’ 5 गोष्टी, ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची करू नका चिंता

 

Tejasswi Prakash Sizzling Photo | छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ने केलं अंधारामध्ये ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ..