Jalgaon Crime | मारहाणीत कैद्याचा मृत्यू ! तुरुंग अधीक्षकांसह 4 रक्षकांवर खुनाचा FIR दाखल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Crime | मुक्ताईनगर तालुक्यातील (Muktainagar Taluka) चांगदेव येथील वॉरंटमधील आरोपीला भुसावळ दुय्यम कारागृहात (Bhusawal Secondary Jail) आणल्यानंतर तुरुंग अधीक्षकांसह तुरुंग (Prison Superintendent) रक्षकांनी (Guards) बेदम मारहाण (Beating) केली होती. या मारहाणीत सुनील भागवत तारु Sunil Bhagwat Taru (वय – 40 रा. चांगदेव. ता. मुक्ताईनगर) या कैद्याचा (Prisoner) मृत्यू (Death) झाला होता. या प्रकरणी तब्बल दोन वर्षानंतर भुसावळमधील तत्कालीन (Jalgaon Crime) तुरुंग अधीक्षकांसह 4 रक्षकांवर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात (Bhusawal City Police Station) खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी तत्कालीन कारागृह अधीक्षक नागनाथ महादेव भानोसे (Prison Superintendent Nagnath Mahadev Bhanose), तुरूंग रक्षक तथा हवालदार सुभाष बाबुराव खरे (Constable Subhash Baburao Khare), भानुदास निवृत्ती पोटे (Bhanudas Nivruti Pote), सिताराम विठ्ठल कदम (Sitaram Vitthal Kadam), अनिल श्रीराम बडगुजर (Anil Shriram Badgujar) या पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 मार्च ते 4 मार्च 2020 या कालावधीत घडला होता. याबाबत मंगळवारी (दि.29) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधीक्षक पी. सोमनाथ वाघचौरे (Deputy Superintendent of Police P. Somnath Waghchaure) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडगम (Police Inspector Gajanan Padgam) तपास करीत आहेत. (Jalgaon Crime)

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील तारु यांना मुक्ताईनगर न्यायालयाच्या (Muktainagar Court) आदेशानुसार 29 फेब्रुवारी 2020 रोजी मुक्ताईनगर पोलिसांनी अटक (Arrest) केली होती व न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना भुसावळ दुय्यम कारागृहात हलवण्यात आले होते. तारु यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्यांना वेळीच उपचार मिळणे आवश्यक होते. मात्र तुरूंग रक्षकांनी तारु यांना बेदम मारहाण केली. तसेच डोक्यावर व ढोपरावर कोणत्यातरी वस्तूने हल्ला केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

 

पोलिसांच्या या हल्ल्यात तारु गंभीर जखमी झाल्यानंतर 4 मार्च रोजी उपचारासाठी हलवण्यात आले.
मात्र त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
परंतु शवविच्छेदन अहवालाच्या निष्कर्षानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत मयत सुनील तारु याची पत्नी मंगला सुनील तारु (वय – 35) यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिली.

 

Web Title :- Jalgaon Crime | murder prisoner death prison superintendent five people murder case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा