Jalgaon Crime News | ‘मिसमॅच डे’ मधून तो आला रुमवर अन् आयुष्यातून झाला Miss; अभियांत्रिकी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : Jalgaon Crime News | महाविद्यालयात ”मिसमॅच डे” साजरा केला जात होता. या कार्यक्रमादरम्यान त्याला फोन आला. तो उठून रुममध्ये गेला अन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Suicide Case)

विश्वंभर खडके (रा. मुळ बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. विश्वंभर हा जी एच रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयात ईएनटीसी च्या पहिल्या वर्षाला शिकत होता. तो महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत होता. महाविद्यालयात सोमवारी मिसमॅच डे हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी तो मित्रांसह गेला होता. कार्यक्रम सुरु असताना त्याला दोन ते तीन वेळा मोबाईलवर कॉल आले. त्यावेळी तो बोलायला उठून बाहेर जात होता. त्यावेळी त्याला खूप घाम आला होता. त्यानंतर तो कार्यक्रम सोडून रुमवर गेला. तेव्हा त्याचा रुममेट शिवमसिंह राजपूत याने कॉल केला होता. कार्यक्रम संपल्यानंतर शिवमसिंह याने विश्वंभरला आवाज दिला. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शिवमसिंह याने दरवाजा जोरात लोटला असता कडी उघडली गेली. आत प्रवेश करताच विश्वंभर याने गळफास घेतल्याचे दिसून आले.(Jalgaon Crime News)

विश्वंभर हा गेल्या दोन तीन दिवसांपासून तणावात होता. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये विश्वंभर हा दोन विषयांमध्ये नापास झाला होता. त्यापैकी एका विषयाची परीक्षा २२ फेब्रुवारीला झाली होती, तर २९ फेब्रुवारी रोजी दुसर्‍या विषयाची परीक्षा होती. बॅकलॉगविषयी त्याने घरी सांगितले नव्हते. परीक्षा झाल्यानंतर विषय निघाले अथवा राहिले तरी त्याविषयी घरी सांगणार असल्याचे त्याने मित्राला सांगितले होते. परंतु, त्यापूर्वीच त्याने टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला संपवून टाकले. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका