Jalgaon Crime News | दुर्दैवी ! रुद्राक्ष महोत्सवात भाविकांना घेऊन जाणाऱ्या चालकाचा माघारी घरी परतत असताना चालकाचा मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Jalgaon Crime News | मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाममध्ये रुद्राक्ष महोत्सवात भाविकांना घेवून गेलेल्या भुसावळमधील व्यक्तीचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खंडवा शहरापासून काही अंतरावर असलेल्या महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. मंगल पाटील (42, कृष्ण नगर, भुसावळ) असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Jalgaon Crime News)

काय घडले नेमके?

मंगल पाटील हा भुसावळ शहरातील कृष्ण नगरात वास्तव्यास होता. मध्यप्रदेशातील खाजगी लक्झरीवर क्लीनर म्हणून कार्यरत होता. तो भाविकांना कथा श्रवणासाठी सिहोर येथे खाजगी लक्झरीने घेवून गेला होता. त्या ठिकाणाहून परतत असताना खंडवा शहरापासून काही अंतरावरील महामार्गावरील एका हॉटेलवर दुपारी भाविक नाश्ता करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी हॉटेलमध्ये काही वस्तू राहिल्याने ती घेण्यासाठी मंगल रस्ता ओलांडत होता. यावेळी रस्ता ओलंडत असताना अचानक एका भरधाव लक्झरी बसने त्यांना धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि मंगलचा जागीच मृत्यू झाला. (Jalgaon Crime News)

या दुर्दैवी घटनेमुळे भुसावळ शहरातील कृष्ण नगरात शोककळा पसरली आहे. मृत मंगलच्या माघारी पत्नी, मुले,
आई, वडील असा परीवार आहे. मंगल हा घरचा कर्ता पुरूष होता.
घरातील कर्ता पुरुष गमावल्याने मंगलच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.
या घटनेमुळे भुसावळ शहरातील कृष्ण नगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :- Jalgaon Crime News | jalgaon driver died in accident who went in rudraksh mahotsav

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | चिन्ह आणि नाव गेल्यावर अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, म्हणाले – ‘लवकरात लवकर…’

Prakash Raj | अभिनेता प्रकाश राज यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ ला बोगस सिनेमा म्हटल्यानंतर अनुपम खेर यांनी दिले ‘हे’ सडेतोड उत्तर