Jalgaon Crime News | मुलाच्या डोळ्यादेखत जन्मदात्या बापाने सोडला जीव

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Jalgaon Crime News | जळगावमध्ये भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत बापाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा रस्त्याच्या बाजूला फेकला गेल्याने जखमी झाला आहे. या अपघातात श्रावण दगा पाटील (वय 67) यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा अमोल श्रावण पाटील हा रस्त्याच्या बाजूला फेकला गेल्याने जखमी झाला आहे. श्रावण दगा पाटील यांच्या अंगावरून डंपर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. श्रावण दगा पाटील व मुलगा अमोल श्रावण पाटील हे पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथे नातेवाईकाच्या गंधमुक्त विधीसाठी जात असताना हा अपघात झाला. (Jalgaon Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
हा अपघात एरंडोल-म्हसावद रस्त्यावर निखिल पेट्रोल पंपाजवळ घडला आहे. या अपघातानंतर डंपरचालक स्वतःहून पोलिस स्टेशनला हजर झाला. वडील श्रावण पाटील हे आपला मुलगा अमोल श्रावण पाटील (रा.कल्याणे खुर्द ता.धरणगाव) ह्याला सोबत घेऊन एम.एच.19 ए.झेड्.1121 क्रमांकाच्या दुचाकीने एरंडोल कडून म्हसावदकडे जात होते. यादरम्यान ते वाटेवर असणाऱ्या निखिल पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना म्हसावदकडून येणाऱ्या एम.एच.15 एफ.व्ही.7707 या क्रमकांच्या डंपरने भरधाव वेगाने येऊन त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यामध्ये श्रावण पाटील हे बाईक चालवत असल्याने पुढील चाकात आले आणि त्यांच्या अंगावरून डंपर गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अमोल पाटील हा पेट्रोल पंपाच्या दिशेला फेकला गेला.
हा अपघात झाल्याचे लक्षात येताच पंपावरील कर्मचारी व आजुबाजूचे लोक घटनास्थळी धावत आले.
त्यांनी तातडीने ट्रँक्टरने श्रावण पाटील यांना एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.
या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या अपघाताप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील हे या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :-Jalgaon Crime News | jalgaon heartbreaking death of father in front of child

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | तो चुनाव आयोग नसून चुना लावणारा आयोग, उद्धव ठाकरेंचा घणाघात (व्हिडिओ)

MP Sanjay Raut | विधिमंडळ पक्ष कार्यालयातून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवला, संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात, म्हणाले – ‘हा शुद्रपणा…’

Pune Crime News | ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मुंढवा येथील ‘बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई