Jalgaon Crime News | इन्स्टावरून प्रेम, विवाहबाह्य संबंध अन्… ; तीन मृतदेह आढळल्याने खळबळ

Jalgaon Crime News | Love on Instagram, extramarital affairs and...; Excitement as three bodies found

जळगाव : Jalgaon Crime News | पाचोरा तालुक्यातल्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या रेल्वे रुळावर एक पुरुष, महिला व तीन वर्षाच्या मुलाचा सोमवार दि.५ मे रोजी मृतदेह आढळला होता. रेल्वेखाली आल्याने तिघांचेही मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले होते. त्यामुळे मृतांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. (Suicide Case)

पोलिसांनी तपासाअंती या तीनही मृतदेहांची ओळख पटवली आहे. भातखंडे खुर्द तालुका पाचोरा येथील रहिवासी राजेंद्र मोरे तसेच बारामती येथील राधिका ठाकरे व तिचा ३ वर्षाचा मुलगा सारंग अशी मृतांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिक माहितीनुसार, विवाहित असलेला राजेंद्र मोरे याची पत्नी काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून माहेरी निघून गेलेली होती. त्यानंतर राजेंद्रची इंस्टाग्राम वरून बारामती येथील विवाहिता राधिका ठाकरे या महिलेशी ओळख झाली. थोड्याच दिवसात दोघांचे प्रेम बहरले. त्यानंतर राजेंद्र याने बारामती येथे जात राधिकाला आपल्यासोबत पाचोरा येथे आणले.

काही दिवस सोबत राहिल्यानंतर दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु राजेंद्र आणि राधिका यांच्या दोघां कुटुंबीयांचा लग्नाला विरोध असल्यामुळे राजेंद्र आणि राधिकाने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मुलाला एकटं कसं सोडायचं या विवंचनेत असलेल्या राधिकाने यावेळी मुलगा सारंग यालाही सोबत घेतलं. मयत मुलगा हा राधिकाच्या बारामती येथील पतीचा मुलगा होता. या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts