Jalgaon Crime News | तिला आधी शितपेय पाजलं अन् नंतर…; नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Jalgaon Crime News | राज्यात लहान मुलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जळगावमध्ये अशीच अत्याचाराची घटना घडली आहे. यामध्ये शहरातील एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार (Minor Girl Gang Rape Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक (Arrest) करण्यात आली आहे. (Jalgaon Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
जळगाव शहरातील एका भागात 16 वर्षीय पीडित तरुणी कुटुंबासह वास्तव्याला आहे. 7 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता नितू ऊर्फ जोया राजू बागडे, ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार यांनी पीडित तरुणीला चाळीसगाव येथे बोलावले. यानंतर पीडित तरुणी चाळीसगावला पोहोचल्यानंतर आरोपींनी तिला शितपेयातून गुंगीचं औषध दिले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडलं. यानंतर आरोपींनी तिला तिच्या घरी पाठवले. त्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी आरोपी पुन्हा या मुलीला चाळीसगावला घेऊन गेले. तिथे त्यांनी 23 फेब्रुवारीपर्यंत रोज रात्री या मुलीला अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. (Jalgaon Crime News)

यानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने आपल्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. मुलीने सांगितलेली घटना ऐकून तिच्या आईला धक्का बसला. यानंतर आईने पीडित मुलीला घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

Web Title :- Jalgaon Crime News | minor girl molested in jalgaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Crime News | पोलादपूरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची नैराश्याच्या भरात आत्महत्या

Pune Crime News | एक्स्ट्रा चार्जेस कमी करुन घेणे पडले महागात; टीम व्हिव्हर अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून केली फसवणूक

Maharashtra Budget Session 2023 | शिवसेनेनं बजावला 55 आमदारांना व्हीप, भास्कर जाधवांचे टीकास्त्र म्हणाले- ‘अशा व्हीपला आम्ही भीक घालत नाही’