Jalgaon Crime News | अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून एकाची धारधार शस्त्राने हत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Jalgaon Crime News | सध्या वाळू तस्करीचे प्रमाण वाढले आहे. याच वाळू तस्करीवरून झालेल्या वादातून एकाची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. हि घटना (Jalgaon Crime News) रविवारी सकाळी भातखंडे -उत्राण ता. एरंडोलनजीक घडली आहे. सचिन उर्फ सोन्या देवीदास पाटील (३९, रा. अंतुर्ली ता. पाचोरा) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण?
मृत सचिन पाटील हा रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास दुचाकीने भातखंडे गावाहून उत्राणकडे जात होता. यादरम्यान मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक देत फरफटत नेले. यानंतर काही जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात सचिन पाटील हा गंभीर जखमी झाला. यानंतर सचिनच्या चुलत भावाने त्याला गंभीर जखमी अवस्थेत पाचोरा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या ठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. (Jalgaon Crime News)

 

या हत्येप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात (Kasoda Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन हा वाळूमाफिया असल्याने पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
काही दिवसापूर्वीच सचिनचा गिरड ता. भडगाव येथील युवकांशी वाद झाला होता.
या प्रकरणी सचिनला अटकसुद्धा करण्यात आली होती. सचिनच्या माघारी आई, पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे.

 

 

Web Title :- Jalgaon Crime News | One was killed with a sharp weapon due to a dispute over illegal sand transport

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | ‘फडणवीसांना ‘या’ पदावर बघायला आवडेल’, छगन भुजबळांनी सांगितली ‘मन की बात’

Aaditya Thackeray | दीपक केसरकारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ते तर माझ्या आजोबांकडे…’

Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…