Jalgaon Crime News | धक्कादायक! आईच्या डोळ्यादेखत मुलाचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू; जळगावमधील घटना

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Jalgaon Crime News | जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये मावशीच्या गावाहून आईसोबत घरी परत येत असताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धावत्या रेल्वेतून पाय घसरुन पडल्यामुळे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना जळगाव जिल्ह्यात रविवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. प्रणव विजय बारी (वय 20 वर्ष, रा. गांधी चौक, पिंप्राळा, जळगाव) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. आपल्या डोळ्यांदेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या आईने एकच आक्रोश केला. आईचा मन हेलावणारा आक्रोश पाहून रेल्वेतील प्रवाशांच्यादेखील डोळ्यांत पाणी आले. (Jalgaon Crime News)

काय घडले नेमके?
प्रणव बारी हा आई-वडिलांसह पिंप्राळा भागातील गांधी चौकात वास्तव्याला होता. सध्या तो पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. नातेवाईकाच्या लग्नासाठी तो जळगावला आला होता. शुक्रवारी प्रणव व त्याची आई ज्योती बारी असे दोघेही भुसावळ येथे मावशीकडे भेटण्यासाठी गेलेले होते. मावशी व आपल्या मावस भावाला भेटून प्रणव हा आईसोबत जळगाव येथे येणासाठी भुसावळ मेमू रेल्वेत बसला होता. आई ज्या सीटवर बसली होती, त्या सीटसमोरच असलेल्या दरवाजात प्रवण हा उभा होता. मेमूने भुसावळ स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर प्रणवचा तोल गेला आणि तो धावत्या रेल्वेतून आईच्या डोळ्यादेखत खाली पडला. (Jalgaon Crime News)

हा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्योती बारी यांनी आरडाओरड केली. यानंतर प्रवाशांनी रेल्वेची चैन ओढून रेल्वे थांबवली, त्यानंतर ज्योती बारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ येथे राहणाऱ्या ज्योती यांच्या बहिणीचा मुलगा राकेश हा देखील घटनास्थळी दाखल झाला. यानंतर प्रणवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूमुळे आई ज्योती बारी यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. प्रणवच्या माघारी मोठी बहीण स्वामिनी, आई, वडील असा परिवार आहे. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून रात्री शोकाकुल वातावरणात प्रणव याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- Jalgaon Crime News | son dies in front of mother after falling from bhusawal memu train

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime News | मुंबईतील आयआयटीमध्ये 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Bigg Boss 16 Grand Finale | पुण्याच्या एमसी स्टॅन बनला ‘बिग बॉस 16’ च्या पर्वाचा विजेता

Beed Crime News | दुर्देवी ! विजेचा धक्का लागल्याने 18 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू