×
Homeक्राईम स्टोरीJalgaon Crime | आई-वडील नातेवाईकांच्या उत्तरकार्यात असतानाच मुलानं घरात केली आत्महत्या, प्रचंड...

Jalgaon Crime | आई-वडील नातेवाईकांच्या उत्तरकार्यात असतानाच मुलानं घरात केली आत्महत्या, प्रचंड खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  आई, वडील, भाऊ व वहिनी नातेवाईकाच्या उत्तरकार्याच्या (answer-work) कार्यक्रमाला गेले असताना त्यांच्या मागे मुलाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना जळगावमध्ये (Jalgaon crime) घडली आहे. ही घटना रविवारी (14) सायंकाळी जळगाव (Jalgaon crime) मधील रामेश्वर कॉलनीत उघडकीस आली आहे. सूरज उर्फ लखन हरि कंगार Suraj alias Lakhan Hari Kangar (वय-24) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सूरज याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज हा अविवाहित होता. तो एमआयडीसीत (MIDC) कंपनीत कामाला होता. रामेश्वर कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ तो कुटुंबासह वास्तव्याला होता. रविवारची सुटी असल्याने तो घरी एकटाच होता. तर वरणगाव येथे नातेवाईकाचे निधन झालेले असल्याने घरातील सर्वजण सकाळीच वरणगावला गेले होते. सायंकाळी 6 च्या सुमारास मोठा भाऊ मुकेश पुढे घरी आला. त्यावेळी घरात सूरजने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

 

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याने गळफास घेतल्याचा अंदाज आहे. मुकेश व इतरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात (district hospital) हलवले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस हवालदार रतिलाल पवार (Police Constable Ratilal Pawar) यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद (Jalgaon Crime) करण्यात आली आहे.

 

Web Title : Jalgaon Crime | parents went to outside suicide hanging son home

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nanded Crime | धक्कादायक ! शेतकर्‍यानं बँकेच्या समोरच संपवलं आयुष्य; जाणून घ्या प्रकरण

Sachin Ahir | …तर पुणे महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढवणार : सचिन आहिर

Ajit Pawar | … म्हणून शेतकऱ्यांना बक्षिसाचे 50 हजार देता आले नाहीत – अजित पवार 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News