Jalgaon Crime | जळगावमधील 2 तरुणांची गळफास घेवून आत्‍महत्‍या, प्रचंड खळबळ

जळगाव न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Jalgaon Crime | जळगावमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 2 युवकांनी आत्‍महत्‍या केल्‍याची घटना उघडकीस आलाय आहे. शहरातील राजीव गांधी नगरात राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज मंगळवारी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली आहे. सुधाकर मधुकर नाडे (वय 35 रा. राजीव गांधी) असं त्या मृत युवकाचे नाव आहे. तसेच, सावदा नजदीक असलेल्या रोझोदा येथील 21 वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या (Jalgaon Crime) केल्याचा प्रकार मध्यरात्री उघडकीस आला. प्रशांत वासूदेव मेढे (वय 21, रा. रोझोदा ता. सावदा) असे मृत तरूणाचे नाव आहे.

पहिल्या घटनेची माहिती अशी की, सुधाकर नाडे (Sudhakar Nade) हा हातमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. मागील काही दिवसांपासून त्यांच्या घरात वाद सुरू होते.
दरम्यान, आज राहत्या घरात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुधाकरने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान, त्याचा मोठा भाऊ बबन नाडे यांनी तात्काळ मृतदेह खाली उतरवून त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात (Ramanand Nagar Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

 

दुसऱ्या घटनेची माहिती अशी की, सावदा (Sawda) येथून जवळ असलेल्या रोझोदा येथील
प्रशांत वासूदेव मेढेने (Prashant Vasudev Medhe) राहत्या घरात गळफास घेवून
आत्महत्या केल्याचे मध्यरात्री उघडकीस आले आहे.
प्रशांत मेढे हा तरुण रात्री कुटुंबियासह जेवण करून 11 वाजता झोपायला गेला.
रात्री 11 ते मध्यरात्री 1 वाजण्याच्या दरम्यान त्याने काहीही कारण नसतांना राहत्या घरात गळफास घेतल्याचे दिसून आले.
त्याला तात्काळ खाली उतरवून गोदावरी मेडीकल कॉलेजमध्ये दाखल केले.
मात्र, त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वडील वासुदेव धनजी मेढे यांच्या खबरीवरून सावदा पोलीस ठाण्यात (Sawda Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Jalgaon Crime | Suicide by hanging of 2 youths from Jalgaon, huge excitement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी

Pune News | पुण्यातही सरकारने निर्बंध शिथिल करावेत; व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा – शहर काँग्रेस उपाध्यक्ष विरेंद्र किराड

NTPC Recruitment 2021 | NTPC मध्ये विविध पदांसाठी भरती; पगार 71 हजार रुपये