Jalgaon Crime | एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात थांबवून अल्पवयीन मुलीशी केले अश्लील कृत्य

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महिलांवर तसेच अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जळगावमधूनही (Jalgaon Crime) अशीच एक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात अडवून अश्लील कृत्य केलचं. पण तिला त्याने जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात (Peth Police Station) पोक्सोसह विविध कलमातंर्गत संबंधित तरूणांवर गुन्हा (Jalgaon Crime) दाखल करण्यात आला आहे. कुलदीप रवींद्र सपकाळे असं गुन्हा दाखल झालेल्या तरूणाच नाव आहे.

 

कुलदीप सपकाळे हा धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवासी आहे.
त्याचे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्यातून तो अनेकदा पीडितेचा पाठलाग करायचा.
गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. गुरुवारी पीडिता आपल्या मैत्रिणीसोबत कामानिमित्त गेली होती.
अग्रवाल चौकातून दोन्ही मुली जात असताना पीडितेला कुलदीपने भर रस्त्यात आडवले. ‘तू फक्त माझी आहेस, आणि तू माझी झाली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशा शब्दांत आरोपीनं पीडितेला धमकी दिली.
कुलदीपने पीडितेच्या मैत्रिणीलाही अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने थेट जिल्हा पेठ पेालीस ठाण्यात (Jalgaon Crime) तरूणाविरोधात फिर्याद दिली आहे.

 

Web Title :- Jalgaon Crime | young man give threat to death to minor girl in one sided love in jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Udayanraje Bhosale | ‘हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा’ (व्हिडीओ)

Actress Shweta Tiwari | 40 व्या वर्षी आपल्याच मुलीवर हॉटनेसच्या बाबतीत श्वेताने केली मात, गोल्डन शॉर्ट ड्रेसमध्ये शेयर केले छायाचित्र

Pune News | पुण्यातील हडपसरमध्ये अतिक्रमणांवर पाटबंधारे विभाग व पालिकेची धडक कारवाई; 300 झोपड्या जमीनदोस्त