वेळोवेळी पतीला तुसड्यासारखं बोलायची, वैतागलेल्या पतीनं मुलीसमोरच संपवलं अन् स्वतः केलं ‘असं’ काही

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीच्या सततच्या टोमण्याला वैतागून पतीने टोकाचे पाऊल उचलले. पतीने टोमणे मारणाऱ्या पत्नीचा आपल्या 12 वर्षाच्या मुलीसमोर कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केला. त्यानंतर त्याने स्वत: रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जळगाव येथे घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील खेडी गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे बुधवारी (दि.11) पहाटेच्या सुमारास घडली.

सोनल समाधान सावळे (वय-30) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर समाधान सावळे (वय-35) असे धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. समाधान याने आपली 12 वर्षाची मुलगी अंजली हिच्यासमोर पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, सोनल आणि समाधान यांचे 2006 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी समाधान कामानिमित्त सुरत येथे गेला. काही महिन्यापूर्वीच तो काम सोडून गावी परत आला होता. मंगळवारी गावी परतल्यानंतर रात्री उशीरा मुलं आणि पत्नी, मेव्हण्यासोबत जेवण केले. तसेच त्याने पत्नीची चेष्टा केली.

जेवणानंतर सर्वजण समाधानच्या घरात झोपले होते. पहाटे अचानक समाधान याने आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. समाधानने पत्नी सोनल हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. पत्नीच्या आवाजाने त्यांची 12 वर्षाची मुलगी अंजली जागी झाली. सोनलने मुलगी अंजली कडे पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र, समाधानने तीला पाणी देण्यास अंजलीला विरोध केला. अखेर तिने तडफडून प्राण सोडले.
पत्नीचा खून केल्यानंतर समाधान याने घरातून पळ काढला. त्यानंतर मुलगी अंजलीने मामाच्या घरी धाव घेत घडलेला सगळा प्रकार सांगितला. दरम्यान त्यांनी तात्काळ पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. पत्निचा खून केल्यानंतर समाधान याने रेल्वे स्थानकावर जाऊन भरधाव वेगात जाणाऱ्या एका रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज ला लाईक करा : https://www.facebook.com/policenama/