जळगावात आज रंगणार महापैारपदाची निवडणूक

जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज ऑनलाईन मतदान होत आहे. दुपारी एक वाजता ऑनलाईन मतदान होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे.

शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी फुटीर गटातील कुलभूषण पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. भाजपतर्फे महापौर पदासाठी प्रतिभा कापसे, भारती सोनवणे तर उपमहापौर पदासाठी सुरेश सोनवणे, मयुर कापसे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

भाजपकडे 57 नगरसेवक आहेत. तर शिवसेनेकडे केवळ 15 सदस्य आहेत परंतु महापौर उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेने आव्हान दिले आहे. भाजपचे तब्बल 31 नगरसेवक फुटले आहेत. ते सेनेला मिळाले आहेत. शिवाय एमआयएम च्या तीन सदस्यांनीही सेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवड चुरशीची झाली आहे.