Jalgaon News : शेतकर्‍याकडून लाच घेणारा CBI च्या जाळ्यात

जळगाव : शेतकर्‍याकडून ट्रॅक्टर कर्ज वेळेत न फेडले गेल्याने जप्तीचा धाक दाखवून २० हजार रुपयं लाच मागणार्‍या बँक अधिकार्‍याला सीबीआयच्या लाच लुचपत प्रथकाने सापळा रचून पकडले.

प्रशांत साबळे (रा़ औरंगाबाद) असे रंगेहाथ पकडलेल्याचे नाव आहे. शेतकर्‍याने ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेतले होते. त्याचे हफ्ते थकले होते. साबळे याने या शेतकर्‍याला कर्जफेड न केल्याने ट्रॅक्टर जप्त करण्याची भिती दाखवली.

ट्रॅक्टर जप्त करु नये, यासाठी त्यांच्याकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याची तक्रार पुण्यातील सीबीआयच्या लाच लचुपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. त्यानुसार पुणे पथकाने सापळा रचून शेतकर्‍याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रशांत साबळे याला पकडले.